HomeमहामुंबईमुंबईMarathi Commentry : यापुढे महाराष्ट्रात राहून मराठीची गळचेपी चालणार नाही, हॉटस्टारविरोधात मनसे...

Marathi Commentry : यापुढे महाराष्ट्रात राहून मराठीची गळचेपी चालणार नाही, हॉटस्टारविरोधात मनसे आक्रमक

Subscribe

मुंबई : मनसेचे नेते अमेय खोपकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला आहे. मराठी समालोचनाच्या मुद्यावरून मनसे नेते अमेय खोपकर आणि मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी, केतन नाईक हे थेट हॉटस्टारच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी त्यांनी हॉटस्टारवर मराठी समालोचन का नाही? असा सवाल करत हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच, त्यांनी यावेळी मंत्री उदय सामंत यांना फोन लावला. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेची अमलबजावणी होईल, असे लेखी पत्र घ्या, असे म्हणत उदय सामंत यांनी मनसेच्या मागणीला पाठिंबा दिला. तसेच, 2 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले आहे. ज्यामध्ये आता चॅम्पियन्स ट्रॉफीपासून मराठी पर्यायाचा समावेश होणार असल्याचे आश्वासन दिले आहे. (Marathi Commentry MNS on hotstar issue Amey Khopkar and mns worker at office premises)

हेही वाचा : Delhi Crime : सूटकेसमध्ये सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघे गजाआड 

हॉटस्टारवर क्रिकेटचे प्रक्षेपण होत असताना मराठी समालोचनाचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. याच जाब विचारण्यासाठी मनसे चित्रपट आघाडीचे प्रमुख अमेय खोपकर यांनी मनसैनिकांसोबत हॉटस्टारच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी त्यांनी हॉटस्टारवर क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण करताना समालोचनासाठी मराठीचा पर्याय देण्याची मागणी केली. मराठीमध्ये क्रिकेट समालोचनाचा पर्याय दिला जाणार असल्याचे लेखी लिहून द्यावे. जोपर्यंत लेखी लिहून देत नाहीत, तोपर्यंत कार्यालयातून जाणार नसल्याची भूमिका अमेय खोपकर यांनी घेतली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनही तुम्ही तिचा पर्याय का देत नाहीत? असा सवाल अमेय खोपकर यांनी जाब विचारला.

लेखी पत्र मिळाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अमेय खोपकर म्हणाले की, “मी भेटायला आलो नव्हतो धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी भांडावे लागत असले तर ते दुर्दैव आहे. हॉटस्टारवर जे क्रिकेटचे सामने दाखवले जातात, ते मराठीमध्ये समालोचन व्हावे यासाठी आम्हाला लेखी आश्वासन मागितले आहे. आता हॉटस्टारने आम्हाला राज ठाकरे यांच्या नावाने पत्र दिले आहे. आता मराठी भाषेचा सुद्धा समालोचन होणार असे त्यांनी लिहून दिले आहे.” अशी माहिती दिली. तसेच, “महाराष्ट्रात माज हा फक्त मराठी माणसानेच करायचा इतर माणसांनी दादागिरी करायची नाही. हॉटस्टारमध्ये लवकरच मराठीत समालोचन सुरू करत आहेत. मी त्यांचा अभिनंदन करतो. मी बाकी मराठी माणसांनासुद्धा विनंती करतो की सामना पाहताना मराठी भाषेचाच वापर करावा.” अशी ताकीद त्यांनी दिली आहे.