HomeमहामुंबईमुंबईMNS : मनसेचा आज राज्यस्तरीय मेळावा, राज ठाकरेंच्या भूमीकडे लक्ष

MNS : मनसेचा आज राज्यस्तरीय मेळावा, राज ठाकरेंच्या भूमीकडे लक्ष

Subscribe

– प्रेमानंद बच्छाव

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा गुरुवारी (30 जानेवारी) वरळीत होत आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मनसेचा हा पहिलाच राज्यस्तरीय मेळावा आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (MNS Raj Thackeray melava after Maharashtra Assembly Elections 2024)

हेही वाचा : Shambhuraj Desai : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पोलीस – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई 

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. खुद्द राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. अमित ठाकरे यांचा पराभव मनसेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेताना काही महत्वाचे निर्णय घेऊ शकतात. याशिवाय संघटनात्मक फेरबदलाबाबत स्पष्ट संकेत देऊ शकतात.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीला मुंबईत स्वतंत्र मेळावे घेऊन महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.त्यामुळे राज ठाकरे आजच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश देऊ शकतात.गेल्या काही दिवसात कल्याण, डोंबिवली, पनवेलमध्ये परप्रतियांकडून मराठी माणसाची गळचेपी करण्याचे प्रकार घडले. यावरून राज ठाकरे पुन्हा एकदा परप्रांतीय समाजाला इशारा देण्याची शक्यता आहे.


Edited by Abhijeet Jadhav