Homeताज्या घडामोडीMukesh Ambani : प्रगतीसाठी AI नव्हे बुद्धीचा वापर करा; मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना...

Mukesh Ambani : प्रगतीसाठी AI नव्हे बुद्धीचा वापर करा; मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना सल्ला

Subscribe

सध्याच्या डिजिटल युगात AI चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. अनेक डिजिटल प्रोजेक्ट AI वापरामुळे सोपे झाले आहेत. अशात शालेय विद्यार्थ्यांनाही AI चं महत्त्व सांगितले जात आहे. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी विद्यार्थ्यांना सल्ला देताना AI चा वापर करण्यापेक्षा बुद्धीचा वापर असे म्हटले आहे.

मुंबई : सध्याच्या डिजिटल युगात AI चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. अनेक डिजिटल प्रोजेक्ट AI वापरामुळे सोपे झाले आहेत. अशात शालेय विद्यार्थ्यांनाही AI चं महत्त्व सांगितले जात आहे. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी विद्यार्थ्यांना सल्ला देताना AI चा वापर करण्यापेक्षा बुद्धीचा वापर असे म्हटले आहे. पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभात ते संबोधित करत होते. (mukesh ambani reliance industries chairman appeal to student that for success use own intelligence instead of ai)

पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुकेश अंबानी यांनी सांगितले की, “तुमच्या शिक्षणासाठी साधन म्हणून एआयचा वापर करण्याचं कौशल्य असलं पाहिजे. मात्र, तुमची चिकित्सात्मक वैचारिक क्षमता सोडू नका. तुम्हाला चॅटजीपीटीचा वापर नक्की करा मात्र आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे जाऊ शकतो”.

याशिवाय, “या शतकाच्या अखेरीस भारत जगातील पहिला सर्वात समृद्ध देश बनेल. मात्र, या विकासात पृथ्वीला धोका निर्माण होऊ नये. खनिज तेलाकडून हरित ऊर्जेकडे जायला हवे, त्या बदलाचा वेग अधिक असावा. भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, जगातील कोणतीही ताकद भारताला विकासापासून रोखू शकत नाही”, असेही मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.

या समारंभात पर्यावरण संरक्षणावरही मुकेश अंबानी यांनी भाष्य केलं. त्यानुसार, “हरित ऊर्जा, हरित सामग्री आणि एआच्या समन्व्यानं मानवाच्या भविष्याला आकार देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पंडीत दीनदयाल ऊर्जा विद्यापीठानं यामध्ये महत्त्वाचं काम करावं”, असेही मुकेश अंबानी यांनी सांगितले.


हेही वाचा – Maha Kumbh stampede : सैन्याकडे व्यवस्थापन का सोपविले नाही? प्रेमानंद पुरींचा योगी सरकारला सवाल