HomeमहामुंबईमुंबईMumbai Bridge : एकापाठोपाठ एक सुरू आहेत पुलांची कामे, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत...

Mumbai Bridge : एकापाठोपाठ एक सुरू आहेत पुलांची कामे, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत भर

Subscribe

मुंबई, ठाणे या भागात पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी ब्रिटिशकालीन पूल उभारण्यात आले होते. परंतु, आता या पुलांचे आयुष्य संपल्यामुळे हे पूल पाडण्यात येत असून त्यांची पुनर्बांधणी करण्यात येत आहेत.

मुंबई : मुंबई, ठाणे या भागात पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी ब्रिटिशकालीन पूल उभारण्यात आले होते. परंतु, आता या पुलांचे आयुष्य संपल्यामुळे हे पूल पाडण्यात येत असून त्यांची पुनर्बांधणी करण्यात येत आहेत. जुलै 2018 मध्ये उपनगरातील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल पडला. या घटनेत दोन निष्पांपांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेची दखल थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतली. त्यांनी या घटनेनंतर मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमधील सर्व पादचारी पुलांचे आणि वाहतूक होणाऱ्या पुलांचे ऑडिट केले. ज्यानंतर ब्रिटिशकालीन पूल आणि धोकादायक पूल तोडून त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Mumbai Bridge works are going on one after other, adding to problems of common citizens)

2018 मध्ये अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पडल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. पण हा पूल बांधण्यासाठी तब्बल दोन वर्ष लागली. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. साधारणतः 2023 मध्ये हा पूल पुर्णवेळासाठी सुरू करण्यात आला. परंतु, या पुलाचे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले, आजही या पुलाचे काम सुरू आहे. ज्यामुळे आताही या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. परंतु, केवळ हाच पूल नाही तर असे अनेक पूल आहेत, जे जीर्ण झाल्याने त्याचे पाडकाम करण्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेळ, पैसा, वाहतूक कोंडीमुळे होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे.

हेही वाचा… Elphinstone Bridge : मुंबईकरांचे हाल होणार, 125 वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल पाडला जाणार

गोखले पूल, मुंबई सेंट्रल पूल, पत्री पूल, लोअर परळ (डिलायल रोड) पूल, झेड ब्रीज (माटुंगा पूर्व-पश्चिमला जोडणारा पूल), रे रोडचा पूल, भायखळा आणि सॅन्डहर्स्ट रोड स्थानकांच्या मध्ये असलेला उड्डाणपूल, कर्नाक पूल (दक्षिण मुंबईतील पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा पूल) आजही बंद आहेत. यामधील गोखले पूल, मुंबई सेंट्रल पूल, पत्री पूल (कल्याण), लोअर परळ (डिलायल रोड) पूल प्रवासासाठी खुले असले तरी या मार्गावर वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, माटुंगा रोड आणि माटुंगा या मार्गावरील पूर्व-पश्चिमेला जोडणारा झेड ब्रीज बंद असल्याने या मार्गावरून येणा-जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कारण झेड ब्रीजमुळे नागरिक माटुंगा पश्चिमेवरून माटुंगा पूर्वेकडे सहज जाऊ शकत होते. परंतु, गेल्या दीड वर्षांपासून हा पूल बंद असल्याने नागरिकांना दादरमार्गे वळसा घालून जावे लागत आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील एकापाठोपाठ एक जीर्ण झालेल्या पुलांचे तोडकाम करण्याचा निर्णय घेण्यात आले. सायन आरओबी पूल, कर्नाक पूल, बेलासिस पूल आणि रे रोड पूल हे ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाल्यामुळे त्यांना पाडण्यात आले आहे. या चार पुलांनंतर आता 125 वर्ष जुना म्हणजेच ब्रिटिश काळातील आणखी एक पूल लवरकच म्हणजेच फेब्रुवारीमध्ये पाडण्यात येणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्ष जुना एलफिन्स्टन पूल पाडण्यात येणार आहे. ज्यामुळे मुंबईकरांचे पुन्हा हाल होणार आहे. मुंबईत आधीच अनेक पूल दुरुस्तीच्या कारणामुळे बंद असल्याने मुंबईकरांना हव्या त्या ठिकाणी जाण्याकरिता विविध मार्गांनी वळसा घालून जावा लागतो. त्यात आता दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेल्या एलफिन्स्टन पुलाला पाडण्यात आले तर यामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहेत.