Homeक्राइमMumbai Crime : केबीसी लॉटरीच्या नावे महिलेची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Crime : केबीसी लॉटरीच्या नावे महिलेची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Subscribe

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात ऑनलाइन गंडा घालण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असाच ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मुंबई उपनगरातील बोरिवलीमध्ये उघडकीस आला आहे. केबीसी लॉटरीच्या नावाने एका 58 वर्षांच्या महिलेची दोन भामट्यांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई (अरुण सावरटकर) : सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात ऑनलाइन गंडा घालण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असाच ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मुंबई उपनगरातील बोरिवलीमध्ये उघडकीस आला आहे. केबीसी लॉटरीच्या नावाने एका 58 वर्षांच्या महिलेची दोन भामट्यांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या भामट्यांनी महिलेची सुमारे सात लाखांना फसवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही भामट्यांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलेला आहे. तक्रारदार महिला ही बोरिवली परिसरात राहत असून तिची विवाहीत मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील चारकोप परिसरात राहते. (Mumbai Crime Fraud of woman in favor of KBC lottery, case registered against both)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये 58 वर्षीय महिलेच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर तिला केबीसीची 10 लाखांची लॉटरी लागल्याचे दिसून आले. त्यानंतर तिच्याशी दोन व्यक्ती संपर्कात होते. त्यांनी तिचे अभिनंदन करून तिची माहिती, तिच्या बँक खात्यासह इतर माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांवर विश्‍वास ठेवून त्यांनी सांगितलेली सर्व माहिती या मगिलेकडून शेअर करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांनी बक्षिसाची रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होणार असल्याचे सांगितले. त्यासाठी प्रोसेसिंग फीसह विविध कारणासाठी तिच्याकडून 07 लाख 14 हजार रुपये घेण्यात आले.

हेही वाचा… Mumbai Crime : आजाराचा फायदा घेत 78 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षीय तरुणाला अटक

धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेने ही रक्कम पाठवूनही त्यांनी बक्षिसाची रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही तिच्याकडून आणखीन पैशांची मागणी करत होते. जर तुम्ही पैसे भरले नाहीत तर आधी भरण्यात आलेले 7 लाख र रुपये सुद्धा परत मिळणार नाही किंवा बक्षिसाची रक्कमही तिच्या बँक खात्यात जमा होणार नाही, असे या महिलेला आरोपींकडून सांगण्यात आले होते. परंतु, हे सर्व संशयास्पद वाटताच या महिलेने घडलेला सर्व प्रकार मुलीसह जावयाला सांगितला. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिच्या वतीने तिच्या जावयाने बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बोरिवली पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या दोन्ही भामट्यांचा शोध घेण्यात येत आहे.