HomeमहामुंबईमुंबईMumbai : मुंबईत नालेसफाई कामाला लवकर सुरुवात होणार, बीएमसीकडून 590 कोटींचे कंत्राट

Mumbai : मुंबईत नालेसफाई कामाला लवकर सुरुवात होणार, बीएमसीकडून 590 कोटींचे कंत्राट

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी खात्याने यंदा नालेसफाईच्या कामासाठी घाई करीत टेंडर प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आहे. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर येथील लहान – मोठ्या नाल्यांमधून गाळ काढणे आणि मिठी नदीमधील गाळ काढणे आदी कामासाठी पुढील दोन वर्षांसाठी मुंबई महापालिका तब्बल 590 कोटी रुपये खर्च करणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत, मात्र ज्या कंत्राटदारांकडून योग्य प्रतिसाद लाभेल आणि जे कंत्राटदार महापालिका अटी शर्ती यांचे पालन करून काम करण्यास पात्र ठरतील अशा कंत्राटदारांनाच हे नालेसफाईचे कंत्राट काम देण्यात येणार आहे. (Mumbai Drain cleaning work to start soon in Mumbai, BMC awards contract worth Rs 590 crore)

हेही वाचा : Five Day Banking Week : बँकेचा पाच दिवसांचा आठवडा? बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता 

मुंबईत 26 जुलै 2005 रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यादिवशी 944 मिमी इतका पाऊस पडला होता आणि त्याच दिवशी समुद्रात मोठी भरती होती. त्यामुळे मुंबईत नाले तुंबले आणि नद्यांना पूर आला होता. या पुरस्थितीमुळे मोठी जीवित हानी झाली होती. तेव्हापासून मुंबई महापालिका खडबडून जागृत झाली. दरवर्षी नालेसफाईची कामे नीटपणे करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र तरीही नालेसफाईच्या कामात काही त्रुटी राहतात. त्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचते. त्याचा परिणाम रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर होतो. त्यामुळे कधी कधी मुंबईकरांचे त्यामुळे हाल होतात.

असा होणार नालेसफाईवर खर्च

– मुंबई शहर भागात नालेसफाई कामासाठी 80 कोटी रुपये ( मोठे नाल्यांसाठी 18 कोटी रुपये आणि छोट्या नाल्यांसाठी 62 कोटी रुपये) खर्च करण्यात येणार आहे.

– पूर्व उपनगर भागातील नालेसफाई कामासाठी 150 कोटी रुपये ( मोठे नाल्यांसाठी 58 कोटी रुपये तर छोटे नाल्यांसाठी 90 कोटी रुपये) खर्च करण्यात येणार आहे.

– पश्चिम उपनगर भागातील नालेसफाई कामासाठी 275 कोटी रुपये (मोठे नाल्यांसाठी 156 कोटी रुपये तर छोटे नाल्यांसाठी 101 कोटी रुपये) खर्च करण्यात येणार आहे.

– मिठी नदीतील सफाई कामासाठी 96 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.


Edited by Abhijeet Jadhav