major fire in byculla Salsette Building मुंबई : दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरात भीषण आग लागली आहे. भायखळ्यातील एका इमारतीला आग लागली आहे. न्यू ग्रेड इंस्टा मीलजवळ असलेल्या सॅलसेट इमारतीला ही आग लागली आहे. शुक्रवारी सकाळी 10:45 वाजताच्या सुमारास ही आग लागली. ही आग भीषण असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. शर्तीच्या प्रयत्नांवर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Mumbai Fire major fire in byculla Salsette Building)
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील न्यू ग्रेड इंस्टा मीलजवळ असलेल्या सॅलसेट इमारतीला भीषण आग लागली आहे. सॅलसेट इमारतीच्या वरच्या भागात आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सॅलसेट इमारत ही रहिवाशी इमारत असल्याचं समजतं. आग लागली त्यावेळी इमारतीत कोणी अडकलं आहे का, याचा तपास अग्निशमन दलाच्या जवानांकडून केलं जात आहे. तसेच, आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याचाही तपास अग्निशमन दलाकडून केला जात आहे.
दरम्यान, मुंबईतील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातत्याने घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दक्षिण मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळील मरीन चेंबर इमारतीत 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास आग लागली होती. त्यानंतर विलेपार्ले (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल क्रमांक – 2 नजीक असलेल्या 10 मजली हॉटेल फेअरमाँटच्या टेरेसच्या भागात आग लागल्याची घटना घडली.
हेही वाचा – Shelar Vs Thackeray : महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी? आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका