HomeमहामुंबईमुंबईMumbai : मुंबई वाहतूक कोंडींवर पर्याय, 5 वर्षात जलवाहतूक वाढवणार तर बीकेसीत...

Mumbai : मुंबई वाहतूक कोंडींवर पर्याय, 5 वर्षात जलवाहतूक वाढवणार तर बीकेसीत पॉड टॅक्सी सुरू होणार

Subscribe

मुंबई : मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका व्हावी यासाठी राज्य सरकारने वाहतूक विभागात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. परिवहन विभागाच्या बैठकीत मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी लवकरच मुंबईत बाईक टॅक्सी सुरू होणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तसेच, आता पुढील 5 वर्षांमध्ये जलवाहतूक वाढवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून येत्या तीन महिन्यांत जलवाहतुकीचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मेट्रोप्रमाणेच जलवाहतुकीसाठीदेखील स्वतंत्र प्रणाली विकसित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात मुंबईकरांना वाहतुकीसाठी नवा पर्याय मिळणार आहे. (Mumbai Transport pod taxi in bkc and water transport start)

हेही वाचा : Shiv Sena UBT : मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, कुठेही जाणार नाही; ठाकरेंच्या माजी खासदारांचे मोठे विधान 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (29 जानेवारी) वॉटर टॅक्सी, रोप वे, पॉड टॅक्सी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरविकास विभागाचे अधिकारी, मेरी टाईम बोर्डाचे अधिकारी, परीवहन आयुक्त यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. तावेली प्रताप सरनाईक म्हणाले की, “मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येसोबतच प्रवाशांची संख्यासुद्धा वाढत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेला मर्यादा येत आहे. दरम्यान, मुंबईत कोणत्या मार्गांवर कोणती परिवहन सेवा उपलब्ध करून देता येईल, याबाबत विचार करावा. तसेच जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुविधेसाठी यंत्रणांनी अधिकच्या परिवहन सेवांचे पर्याय निर्माण करावे,” असा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

मुंबईकरांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी 2028 पर्यंत बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. लंडनच्या हिथरो एअरपोर्टच्या पॉड टॅक्सी बीकेसीत येणार आहेत. ही पॉड टॅक्सी चालकविरहित असणार आहेत. तसेच, वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. एका पॉड टॅक्सीतून एका वेळी 6 जणांना प्रवास करता येणार आहे. पुढच्या दोन वर्षात पॉड टॅक्सीचा प्रकल्प मार्गी लागेल. पॉड टॅक्सीकरता बांद्रा ते कुर्ला दरम्यानच्या मार्गीका निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी आता सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. लंडनच्या हिथरो एअरपोर्टच्या धर्तीवरच पॉड टॅक्सी मुंबईच्या बीकेसीमध्येही चालवल्या जाणार आहेत. खाजगी कंपन्यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच, मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, एक्सप्रेस हायवे, गर्दीची समुद्र किनारी, खाडी अशा ठिकाणी रोप वे सुरू करण्यात येणार आहे. रोप वे सुविधेसाठी योग्य मार्ग शोधण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आदेश दिले आहेत.