HomeमहामुंबईमुंबईMumbai : ती 15 वर्षाची अन् तो 19 वर्षांचा, लग्नाला कुटुंबाने विरोध...

Mumbai : ती 15 वर्षाची अन् तो 19 वर्षांचा, लग्नाला कुटुंबाने विरोध केल्याने धावत्या एक्स्प्रेससमोर आत्महत्या

Subscribe

मुंबई : मुंबई लोकल आणि आत्महत्या हा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. मुंबईतील रेल्वे ट्रकवर अनेकदा आत्महत्येच्या घटना घडलेल्या समोर आल्या आहेत. अशामध्ये नुकतेच रविवारी (26 जानेवारी) विक्रोळी रेल्वे स्थानकात एका प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पण त्यांनी उचलेल्या टोकाच्या पाऊलाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुलीचे वय हे 15 वर्ष असून मुलगा 19 वर्षांचा होता. (Mumbai Vikhroli teenagers end lives in front of express)

हेही वाचा : Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरातील मुजोर बिल्डरला पोलिसांनी घडवली अद्दल, वाचा काय घडले? 

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपच्या हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय नितेश दंडपल्ली या तरुणाचे याच परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीशी अनेक महिन्यांपासून प्रेमसबंध होते. पण काही दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबियांना ही बाब समजली. त्यांनी दोघांच्या नात्याला विरोध दर्शवला आणि मुलीला बाहेर जाण्यास विरोध केला होता. तसेच काही दिवसामध्येच ते तिला गावी पाठवणार होते. त्यामुळे दोघांनी टोकाचा निर्णय घेत आयुष्याचा शेवट केला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला.

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या. भांडुपच्या हनुमान नगर परिसरातील दोघेही रहिवासी असून यामधील 15 वर्षीय मुलगी ही परप्रांतीय असून मुलगा हा महाराष्ट्रातील रहिवाशी आहे. चौकशीमधून समोर आले की, ही घटना घडली तेव्हा मुलगी ही तिच्या आजीसोबत बाहेर गेली होती. पण मध्येच ती आजीपासून दूर झाली. त्यानंतर तिची शोधाशोध सुरू झाली. कुटुंबीयांनी ती गायब झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी याबाबत तपास केला असता रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती दिल्याने हे प्रकरण सोमवारी (27 जानेवारी) उजेडात आले आहे. परिणामी या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.