HomeमहामुंबईमुंबईMumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, या भागातील पुरवठा राहणार...

Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, या भागातील पुरवठा राहणार बंद

Subscribe

उपनगरातील मालाड पश्चिम येथील लिबर्टी जलबोगदा येथे 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी अचानकपणे फुटली. ज्यामुळे आता जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे.

(Mumbai Water Shortage) मुंबई : उपनगरातील मालाड पश्चिम येथील लिबर्टी जलबोगदा येथे 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी अचानकपणे फुटली. ज्यामुळे आता जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे. मात्र, या दुरुस्तीच्या कामामुळे मालाड पश्चिम आणि गोरेगाव पश्चिममधील काही भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे 24 जानेवारीला रात्री 10.30 वाजल्यापासून ते शनिवार, 25 जानेवारीपर्यंत मालाड आणि गोरेगावमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 08 वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. (Mumbai Water Shortage supply in Malad and Goregaon areas will remain closed)

मालाड पश्चिम येथील लिबर्टी जलबोगदा येथे 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी अचानकपणे फुटल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. सदर फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम 24 जानेवारी 2025 रात्री 10.30 वाजता हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे हे काम 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 08 वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालाड पश्चिम आणि गोरेगाव पश्चिम येथील काही भागांचा पाणीपुरवठा 25 जानेवारी 2025 रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि प्रशासनाला सहकार्य करण्यात यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा… Mumbai Auto, Taxi Fare Hike : अखेर रिक्षा, टॅक्सीच्या दरात वाढ; नवे भाडे 01 फेब्रुवारीपासून लागू

या विभागात पाणीपुरवठा बंद…

  • मालाड पश्चिम – अंबुजवाडी, आजमी नगर ,जनकल्याण नगर
  • गोरेगाव पश्चिम – उन्नत नगर, बांगुर नगर, शास्त्री नगर, मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर, जवाहर नगर, भगतसिंग नगर, राम मंदिर मार्ग (महत्त्वाची बाब म्हणजे गोरेगाव पश्चिममधील या भागात मोठ्या प्रमाणात वस्ती असल्याने या लोकांना न होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.)

हेही वाचा… Mumbai Crime : आजाराचा फायदा घेत 78 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षीय तरुणाला अटक