HomeमहामुंबईमुंबईLIVE UPDATE : राहुल सोलापूरकरांच्या पुण्यातील घराबाहरे निदर्शने सुरू

LIVE UPDATE : राहुल सोलापूरकरांच्या पुण्यातील घराबाहरे निदर्शने सुरू

Subscribe

राहुल सोलापूरकरांच्या पुण्यातील घराबाहरे निदर्शने सुरू

शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी

छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता

4/2/2025 22:21:48


देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ सागर बंगल्यावर पोहचले

4/2/2025 22:18:48


झिशान सिद्दीकी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहचले

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौकशीला वेग येण्यासाठी घेतली भेट

4/2/2025 21:22:58


प्रयागराज – कुंभमेळ्यातील सेक्टर 21मध्ये अग्नितांडव

अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी

4/2/2025 21:21:22


शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची बदली

दुहेरी हत्याकांड घटना गांभीर्याने न घेतल्याने पोलीस अधिकाऱ्याची बदली

पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची शिर्डीतून बदली

पालकमंत्री राधाकृष्ण विखेंकडून अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी

4/2/2025 19:42:23


अंबरनाथ सीमा कांबळे हत्येप्रकरणी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

आरोपी राहुल भिंगारकरला पोलीस कोठडी

4/2/2025 19:9:15


सगळेच जण गद्दार नसतात हे सूरज चव्हाण यांनी दाखवून दिले – उद्धव ठाकरे

सूरज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचा अभिमान वाटतो

4/2/2025 18:59:18


प्रवीण दराडे यांची मंत्रालयाच्या विपणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

पंकज कुमार यांची मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागात नियुक्ती

नितीन पाटील यांची नवी मुंबईच्या कौशल्य विकासाचे आयुक्त म्हणून नियुक्ती

श्वेता सिंघल यांची अमरावती विभागाची आयुक्त म्हणून नियुक्ती

डॉ. प्रशांत नारनवरे यांची राज्यपालांचे सचिव म्हणून नियुक्ती

4/2/2025 18:31:38


खिचडी घोटाळ्याप्रकरणी जामीन मिळाल्यावर सूरज चव्हाण मातोश्रीवर पोहचले

आदित्य ठाकरे आणि सूरज चव्हाण यांची गळाभेट

4/2/2025 18:21:52


बोरिवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक अर्धा तास उशिराने

अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत

4/2/2025 17:20:19


राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान मोदींचे उत्तर

चौदावेळा मला संधी दिल्याबद्दल जनतेचे आभार

विकसित भारताचा संकल्प मजबूत करणारं राष्ट्रपतीचं भाषण

पाच दशकं फक्त गरिबी हटावचे नारे सुरू होते

10 वर्ष जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली

काही जण गरिबांच्या झोपडीत फक्त फोटोसेशन करतात

नाव न घेता मोदींची राहुल गांधींवर टीका

4/2/2025 17:5:23


राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा मराठा सेवक संघाकडून निषेध

पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेसमोर सोलापूरकरांच्या वक्तव्याविरोधात मराठा सेवक संघातर्फे आंदोलन

सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

4/2/2025 16:56:6


धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेला अंजली दमानिया देणार उत्तर

अंजली दमानियांनी आज धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार उघड केला

दमानियांये आरोप निराधार असल्याचे प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिले

दमानियांचा एकही आरोप आतापर्यंत सिद्ध झाला का?

धनंजय मुंडेंच्या आरोपांना दमानिया दुपारी 4 वाजता देणार उत्तर


59 दिवस माझ्यावर मीडिया ट्रायल – धनंजय मुंडे

अंजली दमानिया यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही

दमानियांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत

59 दिवसांपासून माझ्याविरोधात मीडिया ट्रायल सुरु आहे

अंजली दामानियांनी आतापर्यंत केलेला एकही आरोप सिद्ध झाला का?

दामानियांचा अंजली ‘बदनामियाँ’ असा खोचक उल्लेख धनंजय मुंडेंकडून


महाराष्ट्रातील पीकविमा घोटाळा चौकशीची संसदेत मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पीकविमा घोटाळा चौकशीची मागणी

खासदार सुप्रिया सुळेंच्या मागणीला केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद


महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा कुस्तीगीर परिषदेला परत करणार – चंद्रहार पाटील

पैलवान शिवराज राक्षेवर पंचांकडून अन्याय
पंचांच्या निर्णयामुळे कुस्तीगीर परिषद बदनाम
कुस्ती स्पर्धेत राजकारण होत आहे
पंचांच्या निर्णयावरुन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक


मुंबईतील अनेक घरांमधील गॅस काल रात्रीपासून पेटलेच नाहीत

महानगर गॅसची पाईपलाईन दादर येथे फुटली

रात्री ८ वाजेपासून महानगरचा गॅसपुरवठा खंडीत

दादर; सायन; प्रतिक्षा नगर; वडाळा भागात गॅस पाईपलाईन बंद

गॅस बंद असल्यानं हॉटेलबाहेर रांगा

काल रात्रीपासून दुरुस्तीचे काम सुरुच

दुपारी १ पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता



मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टीतील गाळेधारकांना भरावा लागणार मुंबई महापालिका कर

झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांना लागणार कर, झोपडपट्टीतील गाळेधारकांकडून सुमारे 350 कोटी इतका महसूल अपेक्षित

मुंबई महापालिकेत अडीच लाख झोपडपट्ट्या, त्यातील 20 टक्के झोपडपट्ट्यांमध्ये उद्योगधंदे दुकाने गोदाम हॉटेल्स अशा व्यवसायिक कारणासाठी वापर

या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून मालमत्ता कर मुंबई महापालिका वसूल करणार

यातून सुमारे 350 कोटी इतका महसूल प्राप्त होणे अपेक्षित


मुंबई महापालिका बजेट

– मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरभक्कम वाढ
– पालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षात यंदा 14.19 टक्क्यांनी वाढ
– महापालिकेचा अर्थसंकल्प 74427.41 कोटींचा

– जल आणि मलनिसारण विभागासाठी 2663.15 कोटी तरतूद
– रस्ते व वाहतूक खात्याकरितव 5100 कोटी रुपयांची तरतूद
– कोस्टल रोड साठी 1507 कोटी रुपयांची तरतूद
– दहिसर ते भाईंदर कोस्टल रोड प्रकलापासाठी 4300 कोटी तरतूद
– गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958.73 कोटी रुपयांची तरतूद
– पुल खात्याकरिता 8238.73 रुपयांची तरतूद

– आरोग्य खात्याच्या महसुली अर्थसंकल्पात 5208.70 कोटींची तरतूद
– आरोग्य खात्याच्या भांडवली अर्थसंकल्पात 2172.73 तरतूद

  • मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 1333 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याची अर्थसंकल्पात माहिती उर्वरित काँक्रिटीकरण हे दोन टप्प्यांमध्ये हाती घेणार
  • पर्यावरण खात्या करिता 113.18 कोटींची तरतूद
    घनकचरा व्यवस्थापन खात्यासाठी 123.42 कोटींची तरतूद
    पर्जन्य जलवाहिन्या खात्यासाठी 2200 कोटी रुपयांची तरतूद
  • अग्निशमन दल खात्यासाठी 216.72 कोटी तरतूद
    आपत्ती व्यवस्थापन विभागाकरिता 309 कोटी तरतूद


शिवसेना ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर 

शिवसेना ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्यात जामीन मंजूर


राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक

राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) मंत्र्यांची बैठक होणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी बैठक होणार

पक्षाच्या मंत्र्यांच्या काही अडचणी आणि विषय आहेत का, याची या बैठकीत चर्चा होणार


नारायण गडाचे महंत घेणार देशमुख कुटुंबियांची भेट

बीड मधील नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज आज दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार


परळीतील 22 पीकविमा केंद्रावर बंदी

परळीतील 22 पीकविमा सीएससी केंद्रावर बंदीची कुऱ्हाड

परळीत पीकविमा घोटाळ्याच्या आरोपानंतर कारवाई


मुंबई – सूरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी 

कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे सूरज चव्हाण अटकेत आहेत


अंजली दामनियांयी आज पत्रकार परिषद 


धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचाच नाही तर आमदारकीचाही राजीनामा द्यावे लागेल

ऑफिस ऑफ प्रॉफिट प्रकरणाचे पुरावे आज अंजली दमानिया करणार सादर


वर्षा बंगल्याच्या आवारत कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग

संजय राऊतांचा पुन्हा एकदा वर्षा बंगल्याबद्दल धक्कादायक खुलासा
वर्षा बंगल्याच्या आवारात कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याचे शिंग पूरलेली आहेत
मंतरलेली शिंगं वर्षा बंगल्यात पूरलेली असल्याची माहिती तिथल्या स्टाफकडून कळले आहे
मुख्ममंत्री टिकू नये यासाठी हे केले असल्याची माहिती आहे
मुख्यमंत्री का अस्थिर आणि अस्वस्थ आहे?


 मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने

सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल धिम्या गतीने
मध्य रेल्वे लोकल 10 ते 12 मिनिटं उशिराने