Homeदेश-विदेशतडीपार माणसांकडून गृहमंत्रिपदाची गरिमा सांभाळण्याची काय अपेक्षा ठेवणार, शरद पवारांची शहांवर सडकून...

तडीपार माणसांकडून गृहमंत्रिपदाची गरिमा सांभाळण्याची काय अपेक्षा ठेवणार, शरद पवारांची शहांवर सडकून टीका

Subscribe

Sharad Pawar Vs Shah : मुंबई : आजपर्यंत अनेकांनी गृहमंत्रीपद भूषवलं आहे. पण या पदाचा मान सर्वांनी जपला, आणि आजच्या गृहमंत्र्यांकडून देखील तीच अपेक्षा असल्याचे सांगत या पदाची गरिमा राखा, असा सल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिर्डीत नुकत्याच झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यालाच यावेळी शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. (ncp sharad pawar criticise central government home minister amit shah over maharashtra crime)

शरद पवार म्हणाले, आजपर्यंत त्यापैकी कुणालाही राज्यातून तडीपार करण्यात आलं नाही. तडीपार न केलेले आणि गृहखातं सांभाळून देशाला योगदान देणारे हे नेते होते, असा टोला शरद पवारांनी अमित शहा यांना लगावला.

गृहमंत्रिपदाची गरिमा राखली गेली पाहिजे. आजपर्यंतच्या कोणत्याही गृहमंत्र्याला त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आलं नाही. तडीपार न केलेले आणि गृहखातं सांभाळून देशासाठी योगदान देणारे हे नेते होते, असेही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – Thackeray vs Shah : मोदी – शहा हे धाडस कधीच दाखवणार नाहीत, ठाकरे गटाची टीका

नुकत्याच झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनात अमित शहा यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली होती. 1978 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्र अस्थिर होता. या अस्थिरतेला संपवून स्थिर सरकार देण्याचं काम जनतेनं केले आहे. लोकसभेनंतर विधानसभेत आपला विजय होईल, असं विरोधकांना वाटत होते. पण, त्यांचे स्वप्न मोडण्याचं काम जनतेने केले आहे, असं अमित शहांनी म्हटलं. शरद पवारांनी धोक्याचं राजकारण केले. तर अंतिम धोका देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. त्या दोघांना जनतेनं घरी बसवलं, असं शहा म्हणाले होते.

या देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, स्वातंत्र्यानंतर अत्यंत प्रभावी आणि सर्व देशाचं राज्यांना एकत्रित करण्याचं काम सरदार पटेल यांनी केलं. त्यानंतर यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. या पदाची गरिमा आणि प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली.

त्यांना 1978 सालापासूनची माझी माहिती आहे. 1958 पासून मी राजकारणात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांना माहीत नसेल, 78 साली हे कुठे होते हे मला माहीत नाही. पण 78 साली मी मुख्यमंत्री होतो. त्यात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, प्रमिलाताई आदी कर्तृत्वान लोक, जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. नंतरच्या काळात देशात वेगवेगळे पक्ष सत्तेत होते. पण राजकीय पक्षातील नेत्यात सुसंवाद होता. उदाहरणच द्यायचं तर वाजपेयी आणि आडवाणी यांचं नाव घ्यायला हवं. हे कर्तृत्ववान लोक होते. ते अतिरेकी भूमिका घेऊन समाजकारण किंवा राजकारण केलं नाही. पण हल्लीच्या गृहमंत्र्यांनी जे भाषण केलं, मी आणि उद्धव ठाकरेंवर जी टीका केली, त्यावर न बोललं बरं. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी या म्हणीची आठवण शरद पवारांनी यावेळी करून दिली.

हेही वाचा – Thackeray on Shah : या महाराष्ट्रात अमित शहांनी XX आणि गांडुळांची पैदास, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका