HomeमहामुंबईमुंबईDhananjay Munde : हा माणूस नशीबवान, सगळे होऊन सुद्धा दादा छातीचा कोट...

Dhananjay Munde : हा माणूस नशीबवान, सगळे होऊन सुद्धा दादा छातीचा कोट करून उभे; आव्हाडांची पोस्ट चर्चेत

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोज नवे आरोप होत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर धनंजय मुंडे यांच्या गैरप्रकाराचे पुरावेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले. त्यानंतरही मंत्री मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टिप्पणी केली आहे. आमदार आव्हाड म्हणाले की, “हा माणूस (धनंजय मुंड) नशीबवान आहे. सगळं होऊन सुद्धा दादा (अजित पवार) छातीचा कोट करुन उभे आहेत.” असे म्हणत लक्ष केले आहे.  त्यासोबतच आव्हाड म्हणाले की, मी किती कमनशिबी आहे… अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांनी नियोजन समितीच्या बैठकीलाही हजेरी लावली. ल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींशी असलेल्या संबंधामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते आणि मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. मंत्री मुंडे यांच्यावर रोज नित्यनवे आरोप आहेत. परळीतील पीकविमा घोटाळा, शेतकऱ्यांना हार्व्हेस्टर देण्यासाठीचा आर्थिक घोटाळा, परळी औष्णिक उर्जा राख घोटाळा आणि जिल्ह्यातील पवनचक्की मालकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर होत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार बीडमध्ये आले होते. यावेळी प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे होते. मात्र धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवरुन अजित पवारांनी कुठेही धनंजय मुंडे यांना थेट लक्ष्य केले नाही. त्यांचा राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोर्टात टोलवला आहे.

अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची ज्या पद्धतीने पाठराखण होत आहे, त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून संताप आणि खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Namdev Shastri : मस्साजोगमधील आरोपींची मानसिकाताही समजून घेतली पाहिजे – नामदेव शास्त्री

काय आहे आव्हाडांच्या पोस्टमध्ये…

पण हा माणूस नशीबवान आहे सगळे होऊन सुधा दादा छाती चा कोट करून उभे आहेत ..
मी किती कमनशिबी आहे ..
२०१९ मंत्री झालो पालक मंत्री साठी चढाओढ सुरू झाली मला पालघर जिल्हा मिळेल असे मला वाटत होते .. पण..
एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितले की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत माझे ३ आमदार आहेत पण हट्ट धरून बसले आहेत पालघर घ्या रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितले शिंदे साहेब पालघर सोडत नाहीत.
सत्य देवाला माहीत पण मी काही पालक मंत्री होऊ शकलो नाही
मग मी साहेबांन मुळे सोलापूर चा पालक मंत्री झालो आणि मला कोरोना ची लागण झाली आणि काही तासात मला काढून भरणे मामांना जबाबदारी मिळाली दादा थोडे दिवस थांबले असते तर …
अश्या खूप जखमा आहेत
पण कधीच हिशोब दिला नाही की मी हे केले मी ते केले..
२००४ ते २o१४ जेव्हा कोणी उभे राहीला तयार नव्हते तेव्हा सगळ्या अवघड प्रसंगात विरोधकांशी उघड पणानी दोन हात करायची आणि दाखले देत आरोप पलटवून लवायचो पण कधी व्यासपीठावरून त्याचे दाखले देऊन …..मीच करतो मीच करतो असे केले नाही
…कदाचित दादांना हे वागणे आवडत असावे.

हेही वाचा : Anjali Damania : नामदवे शास्त्रींची धनंजय मुंडेंना क्लीनचिट; अंजली दमानिया देणार मुंडेंच्या गुन्हेगारीचे पुरावे