HomeमहामुंबईमुंबईNamdev Shastri : नामदेव शास्त्री आदरणीय, पण असं विधान करु नये; जितेंद्र...

Namdev Shastri : नामदेव शास्त्री आदरणीय, पण असं विधान करु नये; जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली नापसंती

Subscribe

मुंबई – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन विरोधकांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री पुढे आले. धनंजय मुंडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांना एक प्रकारे क्लीनचिट दिली. यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आपण कोणाचे समर्थन करत आहोत, हे नामदेव शास्त्री यांना कळायला पाहिजे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भगवान गडाच्या महंताच्या भूमिकेवर नापसंती व्यक्त केली आहे.

भगवान गड राजकारणापासून मुक्त, आव्हाडांनी करुन दिली आठवण

“भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आज धंनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे.भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरुन आशा गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन आणि पाठराखण होणे, ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. कधीकाळी आपण भगवानगड राजकारणापासून मुक्त करण्याची शपत घेतली होती? आणि आज निष्पाप लोकांचे बळी घोणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुण त्याचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या धंनजय मुंडे, वाल्मिक कराड टोळीचे समर्थन करताय, हे मनाला न पटणारे आहे.” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महंतांचे वक्तव्य भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली देणारे – आव्हाड

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नामदेव शास्त्रींना भगवान बाबांच्या विचारांचीही आठवण करुन दिली, ते म्हणाले की, “शास्त्री महाराज आपल्या बद्दल आम्हाला नितांत आदर आहे, पण आपण धनंजय मुडे, वाल्मिक कराड टोळीची पाठराखण करणे हे भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे.”

धनंजय मुंडेंनी किती सहन करायचे, ते आमच्या क्षेत्रात असते तर मोठे संत झाले असते, असं वक्तव्य नामदेव शास्त्रींनी आज केले. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या गुन्हेगारी आणि राक्षसी राजकीय महत्त्वकांक्षेसाठी त्यांनी उद्धवस्त केलेल्या समाजातील लोकांची यादी देता येईल. त्या सर्वांना आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना भगवान गडावर समाजाची परिषद बोलावून समोरासमोर बसून चर्चा घडवून आणा, म्हणजे धनंजय मुडे वाल्मिक कराड हे किती मोठे ‘संत’ आहेत हे संपूर्ण जगाला कळेल,” असा टोलाही आव्हाडांनी लगावला.

बीड-परळीत हत्या, हल्ले झालेल्यांची यादी

जितेंद्र आव्हाडांनी बीड आणि परळीत हत्या झालेल्याची यादीच वाचून दाखवली. संगीत डिघोळे, परळी, काकासाहेब गर्जे, परळी, महादेव मुंडे परळी, बापु आंधळे परळी, बंडु मुंडे परळी. तर ज्यांच्यावर जीवघेणे हल्ले घडवून आणले आहेत असे महादेव गित्ते परळी, सहदेव सातभाई परळी, राजाभाऊ नेहरकर परळी, यांच्यावर हल्ले झाले आहेत.
प्रा. शिवराज बांगर बीड, बबनभाऊ गित्ते परळी, रामक्रष्ण बांगर, विजयसिंह बांगर पाटोदा, करूणा धनंजय मुंडे परळी, प्रकाश मुंडे नाथ्रा परळी, राजाभाऊ फड परळी या सर्वांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांचे आयुष्य उद्धवस्त केले असा आरोपही आव्हाडांनी केला.

ही यादी समाजातील लोकांची यादी आहे, इतर समाजाची यादी जोडली तर ती फार मोठी होईल, ज्यांना घेवुन मी आपल्याकडे येतो, यांच्या वेदना आणि त्यांना वेदना देणारा कोण आहे? हे आपण महंत म्हणून विचारणार का? असा सवालच त्यांनी नामदेव शास्त्रींना केला.

धंनंजय मुंडेच्या हाताला लावलेल्या सलाईन पेक्षा धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्यामुळे अनाथ झालेली लेकरे, विधवा झालेल्या बायका, आपल्या पोटच्या मुलांना गमावून सतत डोळ्यातून आसवे गाळणारे आई-बाप. यांनी घडवून आणलेल्या हल्ल्याने कायम आधु झालेले लोक, यांनी खोट्या गुन्ह्यांत आडकवल्या नंतर तुरुंगात खितपत पडलेले किंवा रानोमाळ भटकंती करणारे लोक, यांचे दुःख फार मोठे आहे. महंत म्हणून आपण हे दुःख समजावूण घेणार आहात का? असाही सवाल आमदार आव्हाडांनी केला.

…यांना गुन्हेगार कोणी बनवलं ?

सुदर्शन घुले, प्रतीक घुले, गोट्या गित्ते , धनराज फड, सुनिल फड, विष्णु चाटे, रघू फड, यांसारखे समाजातील शेकडो तरुण स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी गुन्हेगार बनवलेत. त्यांच्या कुटुंबाची काय आवस्था आहे? याचाही जाब आव्हाडांनी नामदेव शास्त्रींना केला.

हेही वाचा : Namdev Shastri : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची मानसिकाताही समजून घेतली पाहिजे – नामदेव शास्त्री