Thursday, March 20, 2025
Homeमानिनीतुम्हाला कोणी सिरियसली घेत नाही? ही आहेत कारणे

तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाही? ही आहेत कारणे

Subscribe

वक्तृत्व आणि संभाषण ही एक कला आहे. त्यामुळे हे दोन गुण अवगत असलेल्या व्यक्तीला आपले म्हणणे सहज मांडता येते. यामुळे साहजिकच अशा व्यक्तींचा समोरच्यावर प्रभाव पडतो. पण बऱ्याचवेळा तुम्ही एखाद्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करता पण तो तुमचं एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो .

अशावेळी आपल्या बोलण्याला कोणी सिरियसली घेत नाही हे बघून तुम्ही निराश होता. हे जर सातत्याने होत असेल तर तुमची प्रतिमाही खराब होते. तुम्ही नुसते वाय़फळ बडबड किंवा लेक्चर देता असा समज झाल्याने लोक तुमच्यापासून दोन हात लांब राहू लागतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का? की ही वेळ तुमच्यावर का आली. तर याची प्रामुख्याने तीन कारणे आहेत. त्यातील पहीले कारण आहे तुमची बॉडी लँग्वेज, दुसरे कारण आत्मविश्वासाचा अभाव आणि तिसरे कारण आपले म्हणणे किंवा विचार मांडण्याची चुकीची पद्धत.

वर उल्लेख केलेली तीनही कारणं ही आपल्या व्यक्तीमत्वाचा आरसा समजली जातात. तुम्ही कसे कपडे घालता, बोलता, कसे उठता, कसे बसता, कसे चालता ते कसे खाता , आपली मत कशी मांडता, राग कसा व्यक्त करता हे तुमचं व्यक्तिमत्व सांगत असतं. त्यावरून तुम्ही कसे व्यक्ती आहात याचा अंदाज लावला जातो. यातील एकाही अॅक्शनमध्ये गडबड झाल्यास तुमच्याबदद्ल लोकांची मत तात्काळ बदलतात. त्यामुळे तुम्हाला काय करायला हवं ते बघूया.

आय कॉन्टेक्ट
जर बोलताना तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात न बघता इकडे तिकडे बघत बोलत असाल तर तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे समजले जाते.

मान खाली घालून बसणे किंवा बोलणे
बऱ्याचजणांना बोलताना किंवा ऐकताना खाली मान घालून बसण्याची सवय असते. पण तुमची ही बॉडी लँक्वेज तुम्ही असुरक्षित आणि मानसिकरित्या कमकुवत असल्याचा संदेश देत असते.

हाताची घडी

समोरची व्यक्ती जेव्हा बोलत असते तेव्हा जर तुम्ही हाताची घडी घालून ऐकत असाल तर तो तुमच्यातील अटीट्यूड दर्शवतो.

बोलताना अडखळणे
जर बोलताना तुम्ही अडखळत असाल तर तुमच्यात आत्मविश्वासाची कमी असल्याचे ते संकेत आहेत.

स्व:तला कमी लेखणे
जेव्हा तुम्ही स्व:ताला दुसऱ्यापेक्षा कमी लेखता तेव्हा लोकही तुम्हाला त्याच दृष्टीकोनातून बघतात.

निर्णयक्षमेतचा अभाव

आत्मविश्वास असलेल्या व्यक्ती प्रत्येक आव्हान स्विकारण्यास तयार असतात. सतत नाविन्याच्या शोधात असतात. त्यामुळे त्या निर्णयही पटकन घेतात. याउलट आत्मविश्वास नसलेल्या व्यक्ती निर्णय घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा इतरांमध्ये बिघडते.

आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेहमी स्व:तावर विश्वास ठेवा. आपल्यातील उणीवांवर काम करा. तरच लोकही तुमच्यावर विश्वास करतील.

न ऐकता बोलणे
जर तुम्ही समोरच्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकत नसाल, मध्येच त्याचे बोलणे तोडत असाल तर

अस्पष्ट, अशुद्ध भाषा
जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपली भाषा आणि उच्चार हे स्पष्ट हवेत. जेणेकरून
समोरच्याला आपले म्हणणे कळू शकेल. त्यामुळे भाषेवरही काम करावे.

Manini