HomeमहामुंबईमुंबईMumbai News : महापालिकेने 100 दिवसांत 100 शौचालयांची दुरुस्ती करावी; पियूष गोयल...

Mumbai News : महापालिकेने 100 दिवसांत 100 शौचालयांची दुरुस्ती करावी; पियूष गोयल यांच्याकडून आवाहन

Subscribe

स्वच्छ उत्तर मुंबईसाठी प्रत्येक घटकांनी प्रयत्न करावेत. तसेच, परिसर स्वच्छतेसोबतच प्रशासनाने पुढील 100 दिवसांत 100 शौचालयांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री तथा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार पीयूष गोयल यांनी केले.

मुंबई (मारुती मोरे) : स्वच्छ उत्तर मुंबईसाठी प्रत्येक घटकांनी प्रयत्न करावेत. तसेच, परिसर स्वच्छतेसोबतच प्रशासनाने पुढील 100 दिवसांत 100 शौचालयांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री तथा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार पीयूष गोयल यांनी केले. (Piyush Goyal appeals to Mumbai Municipal Corporation to repair 100 toilets in 100 days)

मुंबई महापालिकेच्या ‘आर/दक्षिण’ विभागातील चारकोप गाव येथे ‘सांसद स्वच्छता ड्राइव्ह’चे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री गोयल हे बोलत होते. यावेळी, स्थानिक आमदार योगेश सागर, उप आयुक्त (परिमंडळ-७) डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त (आर/दक्षिण) मनीष साळवे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले. यावेळी मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात झाली.

हेही वाचा – Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, या भागातील पुरवठा राहणार बंद

पीयूष गोयल म्हणाले की, परिसर स्वच्छतेसाठी प्रशासन प्रयत्न करत असते. पण, स्वच्छता ही केवळ यंत्रणेची जबाबदारी नसून शासन, प्रशासन आणि जनतेचे यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक आहे. स्वच्छ उत्तर मुंबईसाठी प्रत्येक घटकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी पीयूष गोयल यांनी केले. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचा आम्ही ध्यास घेतला आहे. त्या अंतर्गत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

परिसर स्वच्छतेसोबतच प्रशासनाने पुढील 100 दिवसांत 100 शौचालयांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी. तसेच या भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांसंदर्भातील माहिती जनतेपुढे सादर करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी कार्यक्रमादरम्यान दिले. यावेळी, आमदार योगेश सागर यांनीही उपस्थितांना स्वच्छतेबाबत आवाहन करीत संबोधित केले.

हेही वाचा – Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, या भागातील पुरवठा राहणार बंद