मुंबई : मुंबईत भटक्या कुत्र्यांमुळे होणारा उपद्रव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने रेबीज लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिका पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. तसेच, रेबीज लसीकरण आणि प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेने तयार केलेल्या जनजागृतीपर संदेश देणार्या चित्रफितींसह एलईडी वाहनाद्वारे संपूर्ण मुंबई कार्यक्षेत्रामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. (Rabies Background Bhumveer has vaccinated more than 25,000 stray dogs so far)
प्राणी कल्याण करणे व प्राण्यांपासून होणारे संक्रमण टाळण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर हा जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबईतील नागरिकांचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी मुंबई महापालिका वचनबद्ध आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने जनजागृती एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
हेही वाचा – Nashik : नाशिक महानगर प्राधिकरण क्षेत्रासाठी विकास आराखडा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय
मुंबई महापालिकेच्या वतीने ‘मिशन रेबीज’ या संस्थेच्या सहकार्याने मुंबईतील भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यासाठी 28 सप्टेंबर 2024 पासून सामूहिक लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या प्राणी प्रेमी संस्थांच्या मदतीने आजवर सुमारे 25 हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई महापालिका पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.
दाट लोकवस्तीच्या परिसरांवर अधिक लक्ष
रेबीज लसीकरण आणि प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने एलईडी स्क्रिन आधारित वाहन तयार करण्यात आले आहे. याद्वारे माहितीपूर्ण संदेश प्रसारित करण्यात येतील. यामध्ये रेबीजचे धोके, लसीकरणाचे महत्त्व याविषयी माहिती, जबाबदार पाळीव प्राणी मालकी आणि प्राणी कल्याण प्रोत्साहन, रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केल्या जाणार्या उपाययोजनांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे आदी बाबींचा समावेश असेल. या वाहनाच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) जनजागृती करण्यात येणार आहे. प्रामुख्याने उच्च जोखीम असलेला परिसर आणि दाट लोकवस्तीच्या परिसरांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल, असेही डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.
हेही वाचा – Eknath Shinde : आतापर्यंत वंदनीय असणाऱ्या शरद पवारांवरच राऊतांची टीका, एकनाथ शिंदेचा टोला