Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईमुंबईMNS : डॉक्टर मतदारांची नाडी तपासणार की नर्स डायपर बदलणार? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा

MNS : डॉक्टर मतदारांची नाडी तपासणार की नर्स डायपर बदलणार? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा

Subscribe

मुंबई : डॉक्टर आणि नर्सेसला निवडणूक ड्युटी लागल्याने लागल्याने राज ठाकरे यांनी आज गुढी पाडवा मेळाव्यात संताप व्यक्त केला. डॉक्टर मतदारांची नाडी तपासणार की नर्स डायपर बदलणार? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. (Raj Thackeray speech at Shivaji park gudi padwa 2024 live updates targets the Election Commission)

राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सुरुवातीलाच निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, जवळपास 5 वर्षांनी महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. महापालिकाच्या निवडणुका आता होतील आता होतील, असं म्हणता म्हणता अजून होत नाहीत. 2019 च्या निवडणुकांनंतर आता निवडणुका होत आहेत. त्यानंतर आता आचारसंहितावाले जागे झाले आहेत, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

हेही वाचा – Raj Thackery : मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून…; राज ठाकरेंची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका

राज ठाकरे म्हणाले की, काल मी एक बातमी वाचली. आचारसंहिता म्हणून महापालिकेचे डॉक्टर आणि नर्सेस यांना मतदानाच्या कामात गुंतवलं गेलं आहे. डॉक्टर मतदारांच्या नाड्या तपासणार का? की नर्सेस मतदारांचे डायपर बदलणार आहेत? ज्याच्यासाठी त्यांची नेमणूक केली आहेत तिथे ते नसावेत का? असा प्रश्नांचा भडीमार करत राज ठाकरे म्हणाले की, निवडणुका होणार आहेत हे निवडणूक आयोगाला माहिती असते. मग समांतर एक फळी का उभी करत नाहीत? ज्या डॉक्टर्स आणि नर्सेसवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांनी त्या ठिकाणी जावू नयेत. त्यांना कोण कामावरून काढतंय ते पाहतोच, असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

राज ठाकरे म्हणाले की, मी स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले की, मला ते सगळं नको, मला या सगळ्या वाटाघाटीच्या भानगडीत पाडू नका. मला विधानपरिषद किंवा राज्यसभाही नको. पण या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. ती गरज पूर्ण झाली नाही तर राज ठाकरेचे तोंड आहे, हे फडणवीसांना मी स्पष्टपणे सांगितलं. केवळ देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे म्हणून काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी जाहीर करतो, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आजच्या मेळ्याव्यात मांडली.

हेही वाचा – Raj Thackery : फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट