मुंबई – एकनाथ शिंदे महायुतीत अस्वस्थ आणि नाराज आहेत. त्यांची जणू समाधी लागली आहे, असे वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने आपल्याकडे केले असल्याचा दावा ठाकरेंच्या नेत्याने केले आहे. त्याच वेळी शिंदेंच्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस खासदारांच्या 90 टक्के कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना केला आहे. महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दाखले जात असले तरी तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये अंतर्गत खदखद असल्याचे समोर आले आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) खासदार सुनील तटकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या 90 टक्के कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्याचा आरोप केला आहे.
रामदास कदम म्हणाले, सुनील तटकरे यांच्याबद्दल आमचे कोणतेही मतभेद नाहीत, मात्र नाराजी आहे. योगेश कदमला पाडावे असे सुनील तटकरेंच्या मनात कधी येणार नाही. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंडणगड, दापोली येथील राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनी योगेशसाठी काम केले नाही. राष्ट्रवादीच्या 90 टक्के कार्यकर्त्यांनी काम केले नाही. याची लेखी तक्रार मी तटकरेंकडे करणार आहे. त्यांना त्याची दखल घ्यावी लागले, असंही रामदास कदम म्हणाले.
रायगड पालकमंत्रीपदाचा वाद पेटलेला
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या रायगड पालकमंत्रीपदाचा वाद पेटलेला आहे. या वादावर दोन दिवसांत तोडगा निघेल असे शिवसेनेचे नेते गेल्या काही दिवसांपासून म्हणत आहेत, मात्र तोडगा निघालेला नाही. त्यातच आता नवा वाद रामदास कदमांनी पुढे आणाल आहे. तसेच रायगड पालकमंत्रीपदासाठी तटकरेंनी मोठं मन करावे असंही म्हटलं आहे.
हेही वाचा : Sanjay Shirsat : ठाकरे – शिंदे एकत्र आले पाहिजे; शिरसाट स्वपक्षीयांसह विरोधकांच्या निशाण्यावर