ram mandir railway station मुंबई : एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबई उपनगरातील पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर स्थानक परिसरात ही घटना घडली आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर एका अज्ञात रिक्षा चालकाने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, पीडित महिला राम मंदिर स्थानकाच्या परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडली. अत्यंत विकृत अशी ही घटना घडली आहे. (raped in mumbai A 20 year old woman was raped near Ram Mandir station in Mumbai News In Marathi)
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर स्थानक परिसरात एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कारकरून हल्ला करण्यात आला. एका अज्ञात रिक्षा चालकाने हा प्रकार केल्याचे समजते. या हल्ल्यात पीडित मुलीच्या गुप्तांगामध्ये काही दगडाचे तुकडे घालण्यात आले. तसेच, तिच्यावर सिझेरियन ब्लेड आणि दगडाचा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
गोरेगाव पूर्वेतील वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. या हल्ल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे. तसेच, पीडित महिलेला उपचारांसाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान पोलिसांनी पीडित तरुणीकडून संबंधित घटनेचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
आरोपीला अटक केल्यानंतर वनराई पोलिसांकडून आरोपीची अधिकची तपासणी सुरू आहे. त्यानुसार, आरोपी कुठे राहतो, तो या तुरुणीा कुठे भेटला, या सगळ्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मुंबई ही काल सुरक्षित होती, आज सुरक्षित आहे आणि उद्याही सुरक्षित राहील असे बऱ्याच जणांकडून बोलताना पाहायला मिळते. मात्र, मुंबई पोलिसांचं सुरक्षा कवच असलं तरी, या भागांत बलात्काराच्या आणि महिलांवरील हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबईतील महिला सुरक्षित आहेत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
हेही वाचा – Sanjay Raut On Shinde : हे तर वेश्येचे राजकारण, संजय राऊत यांची सडकून टीका