मुंबई : मुंबईत सध्या अडीच हजार ठिकाणी इमारत बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे हवेत धूळ उडते आणि प्रदूषण निर्माण होत आहे. मुंबई महापालिकेने हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी काही नियम बनवले आहेत. मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे प्रदूषणाची समस्या मुंबईकरांना भेडसावत असल्याचे सांगत रवी राजा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासाठी त्यांनी मुंबईत हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने दीर्घकालीन उपायोजना करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते व माजी नगरसेवक रवी राजा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. (Ravi Raja demands long-term solutions to rising pollution in Mumbai)
गेले काही आठवडे मुंबईतील हवेची गुणवत्ता फारच खालावली आहे. वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे प्रत्येक घरात आजारी पडलेल्यांची संख्या एक किंवा दोन आहे. त्यात लहान मुलं सर्दी, खोकला यामुळे खूपच आजारी पडत आहेत. तरी याबाबत विचारणा केली असता वाढतं प्रदूषण कारणीभूत असल्याचे समजते, असे रवी राजा यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : फडणवीसांचे कुटुंब वर्षा बंगल्यात जायला घाबरते का? राऊतांनी का केला असा सवाल
सध्या महापालिकेत जसे शिक्षण आणि आरोग्य असे वेगळे विभाग आहेत, तसा पर्यावरणासाठी एक वेगळा विभाग निर्माण करायला पाहिजे. त्या विभागाला एक वेगळे बजेट देखील देणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा सामना करता येईल. तसेच प्रदूषणाचा सामना करण्यासाठी वॉर्ड पातळीवर, त्या वॉर्डातील गरजांप्रमाणे प्रशासकीय उपाय योजले पाहिजेत आणि त्यासाठी प्रशासकीय आराखडा देखील बनवला पाहिजे. याच्या जोडीला आयआयटीसारख्या नामांकित संस्थांना एकत्र करून एक कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रदूषणाची पातळी वाढायला लागली की, महापालिका जागी होते आणि पुन्हा फेब्रुवारीनंतर हा विषय विसरला जातो. यामुळे प्रदूषणाच्यावर कधीच कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही. त्यामुळे हा विषय वर्षभर महापालिका प्रशासनाच्या अजेंड्यावर असायला हवा, जेणेकरून या वर्षी नागरिकांना जर त्रास सहन करावा लागला आहे तो करावा लागणार नाही. तसेच केलेल्या सूचनांचा महापालिका प्रशासनाने सकारात्मक पातळीवर विचार करावा अशी मागणीही रवी राजा यांनी केली आहे.
हेही वाचा – Education News : महायुती सरकारसाठी शिक्षक लाडके नाहीत का? अर्ध्या लाखाहून अधिक शिक्षकांचा सवाल