saif ali khan attack accused arrest मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या हल्लेखोराने सैफवर सहा वार केले. यामध्ये दोन वार गंभीर असून लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. हल्लेखोराने सैफच्या पाठीत चाकू भोसकला आणि हातावर मानेवर वार केले. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रियाही करावी लागली. परंतू संपूर्ण बॉलिवूड विश्वात नवाब अशी ओळख असलेल्या सैफवर नेमका हल्ला कोणी केला? हल्लेखोराने चोरीसाठी सैफचंच घर का निवडलं? असे प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाले. मात्र, सखोल तपास करत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठेकल्या. (saif ali khan attack accused arrested bangladesh wrestling player police investigation news in marathi)
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असं त्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी तब्बल 35 तुकड्या विविध भागांत तैनात केल्या आणि आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान अनेकांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी दोन संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण दोघेही हल्लेखोर नव्हते. मात्र रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अखेर अटक केली. ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी मोहम्मद याला ताब्यात घेताच पोलिसांनी त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात आणलं आणि अधिकची चौकशी केली.
पोलिसांनी आरोपी शहजाद याची चौकशी केली असता, त्याचे बांगलादेशी कनेक्शन समोर आले. तसेच, तो राष्ट्रीय आणि जिल्हास्तीय पातळीवर कमी वजनी गटात कुस्ती खेळायचा अशीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान, आरोपीची कसून चौखसी केली जात आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी 35 तुकड्या तयार करत आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर घरातून आणि इमारतीतीस परिसरातून कलेक्ट केलेले फिंगरप्रीटही मॅच करण्यात आले. त्यावेळी सर्व फिंगरप्रींट मॅट झाल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
दरम्यान, सैफवरील हल्ल्यानंतर आरोपी ठिकठिकाणी फिरत होता, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं. हल्ल्यानंतरच्या सकाळी आरोपी हा दादरच्या एका मोबाईल शॉपमध्ये हेडफोन्स खरेदी करताना आढळला होता. त्यानंतर तो कबुतरखाना येथे गेला आणि तेथून पुढे तो वरळीच्या सेंच्युरी बाजारला पोहोचला. तिथे एका नाश्त्याच्या स्टॉलवर आरोपी एका व्यक्तीशी बोलत असल्याचे पाहायला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले होते. पोलिसांनी या नाश्ता सेंटरवाल्याची माहिती मिळवली असता त्याचे नाव नवीन एक्का असल्याचे समोर आले. त्याच नाश्ता सेंटरवर आरोपीने पराठा आणि एक पाण्याची बॉटल घेतली होती, आणि त्याचे पेमेंट त्याने गुगल पेच्या माध्यमातून केले होते. मात्र याच पेमेंटमुळे तो अडकला. कारण आरोपीने ज्या नंबरवरून पेमेंट केले, जीपेने पैसे चुकते केले, आरोपीचा तो नंबरच पोलिसांनी त्या नवीन एक्काकडून मिळवला आणि त्या नंबरचं लोकेशन शोधलं.
तांत्रिक बाबीच्या मदतीने आरोपीचे लोकेशन हे ठाण्यातील कासरवडवाली भागातील एका लेबर कॅम्पचे असल्याचे समोर आले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस सेंच्यूरी मिल येथील स्टॉलवर पोहचले आणि सर्वांची चौकशी केली. त्यानतंर त्या फोनच्या आधारे लोकेशने शोधून अखेर रविवारी पहाटे पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहजाद याला अटक केली.
आरोपी शहजादवर कोणते गुन्हे दाखल
- कलम 311 – हत्येचा प्रयत्न किंवा गंभीर इजा करणे, दरोडा आणि लुटीचा प्रयत्न करणे
- कलम 312 – दरोड्याचा प्रयत्न किंवा प्राणघातक शस्त्र घेऊन दरोडा टाकणं
- कलम 331 (4), (6), (7) – घरफोडी
- परकीय नियंत्रण कायदा 1946
सैफला आज मिळणार डिस्चार्ज?
घरात घुसलेल्या चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज कदाचित सैफला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
हेही वाचा – Hotel Trident : धक्कादायक! ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळला 60 वर्षीय महिलेचा मृतदेह