मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्यात घरात अज्ञाताकडून चाकूने हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. 16 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. सैफच्या घरात घडलेल्या घटनेनंतर आरोपी पळून जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत असून पोलिसांकडून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Saif Ali Khan Attack case has been registered against the accused)
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात पहाटेच्या सुमारास झालेल्या हल्ल्यानंतर बॉलीवूड विश्वात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी क्राइम ब्रांचच्या पथकाकडून तपास करण्यात येत असून मुंबई पोलिसांचे पथक सुद्धा आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी आता पोलिसांकडून चोरी, मारहाण व जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या अनुषंगाने आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 311, 312, 331(4), 331(6), 331(7) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. आरोपीचा उद्देश हा चोरी करण्याचा होता की हल्ला करण्याचा होता, की आणखी दुसरा होता याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.
हेही वाचा… Arvind Kejriwal : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर केजरीवालांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले –
किती वाजता आला होता हल्लेखोर?
सैफ अली खानच्या घरी शिरलेला चोरटा हा पहाटे साधरणत: 2.33 वाजताच्या सुमारास आला होता. सुरुवातीला या चोराची झटापट सैफच्या घरातील लिमा म्हणजेच तैमुरला सांभाळणारी आया हिच्यासोबत झाली. त्यानंतर, अभिनेता सैफ आराडाओरड ऐकून धावला. ज्यानंतर, चोरटा व सैफ अली खान यांच्या झटापट झाली. याचवेळी चोराने सैफवर हल्ला केला. या चोराने सैफवर एकूण सहा वार केले. यामध्ये जखमी झालेल्या सैफने आरोपीला सोडल्यानंतर हा आरोपी पायऱ्यांवरुन पळून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. आता, आरोपीचा फोटो समोर आला असून सडपातळ, अंगात टी-शर्ट आणि पाठीवर बॅग घेऊन आरोपी घरात शिरताना दिसून येत आहे.
आरोपीकडून एक कोटीची मागणी…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी लीमा हिला खोलीच्या बाथरूममध्ये कोणीतरी अशल्याची जाणीव झाल्यानंतर तिने बाथरूमचा दरवाजा उघडला. त्यावेळी तिला बाथरूममध्ये एक अज्ञात व्यक्ती दिसला. त्या व्यक्तीने तिला शांत राहायला सांगितले. यावेळी नोकर लीमा हिने चोराला काय हवे असे विचारले. त्यावेळी चोराने पैशांची मागणी केली. किती पैसे पाहिजेल असे नोकर लीमा हिने त्या चोराला विचारले, त्यावेळी चोराने तब्बल एक कोटी रुपयांची मागणी नोकर लीमा हिच्याकडे केली, असे एफआयआरमध्ये नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.