Saif Ali KhanAttack Case : मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान प्रकरणात पुन्हा एक मोठा ट्विस्ट आला आहे. हा ट्विस्ट एवढा मोठा आहे की, यामुळे मुंबई पोलिसांना जबर धक्का बसला आहे. सैफ अली खानवर हल्ला करण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी ज्या शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी नागरिकाला अटक केली, त्याचे फिंगरप्रिंट्स घटनास्थळावरून मिळालेल्या कोणत्याही फिंगरप्रिंटसोबत जुळत नसल्याचे समोर आले आहे. (saif ali khan attack twist shariful islam fingerprint do not match found at crime scene)
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी त्याच्या राहत्या घरात हल्ला करण्यात आला. याप्रकरणी हल्लेखोराचे सीसीटीव्ही फूटेज मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी नागरिकाला अटक केली होती. मात्र, घटनास्थळावरून मिळालेले कोणतेही फिंगरप्रिंट्स हे शरीफुल सोबत जुळत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य सीआयडीने यासंदर्भात निगेटिव्ह रिपोर्ट सादर केला आहे. मुंबई पोलिसांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, शरीफुल हा तरी सैफ खानवर हल्ला करणारा हल्लेखोर आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
हेही वाचा – Guillain Barre Syndrome : गुइलेन सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढली, आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर
16 जानेवारीला पहाटे सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात हल्ला झाला. या प्रकरणानंतर जवळपास 72 तासांनी पोलिसांनी शरीफुल याला अटक केली. शरीफुल हा चोरी करण्याच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात शिरला होता. आणि नंतर त्याने सैफवर चाकू हल्ला केला. मात्र, एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सैफच्या घरातील फिंगरप्रिंट्स आणि शरीफुलचे फिंगरप्रिंट्स एकमेकांशी जुळत नाहीत. यामुळे मुंबई पोलिसांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसऱ्याच कोणत्यातरी व्यक्तीला तर अटक केली नाही ना, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. शरीफुल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शरीफुलला अटक केल्यानंतर सोशल मीडियावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आणि शरीफुल इस्लाम हे दोघेही वेगवेगळ्या व्यक्ती असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. पोलिसांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या अहवालानुसर, शरीफुल इस्लामचे 10 फिंगरप्रिंट्स सीआयडी ब्युरोला पाठवण्यात आले होते. एका सिस्टीम जनरेटेड अहवालानुसार सीआयडीने म्हटले आहे की, घटनास्थळावरून घेण्यात आलेल्या 19 फिंगरप्रिंट्सपैकी एकही फिंगरप्रिंट आरोपीसोबत जुळत नाही. शुक्रवारी पुण्याला पाठवण्यात आलेल्या अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा –Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान, उत्तर वाहिनीचे लोकार्पण, या वेळेत करू शकता प्रवास
तर दुसरीकडे, चेहऱ्यासंबंधी पश्चिम रेल्वेने तयार केलेला अहवाल सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहे. सैफ अली खानच्या बिल्डिंगबाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फूटेज हे फार अस्पष्ट आहे. आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही अधिकारी ते स्पष्ट करू शकलेले नाहीत.