मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत अनेक खुलासे समोर आले आहेत. सैफ अली खान यांच्या घरातील व्यक्तींपासून बाहेरील सर्व स्टाफची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीअंती तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, आरोपीला अटक केल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता, आरोपी वापरत असलेलं सीमकार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचे समोर आले. याप्रकरणी ही महिला आरोपीला ओळखत असल्याचा आरोप आहे. परंतू, चौकशीवेळी या महिलेनं वेगळीच माहिती दिली. (Saif Ali Khan Case Who owns the SIM card of the accused in Saif attack Big information revealed in police investigation)
पोलिसांच्या तापासानुसार, खुकूमोनी शेख असे या महिलेचे नाव असून ही महिला पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील छपरा येथील रहिवाशी आहे. ही महिला बांगलादेशी घुसखोर शरीफुल इस्लाम याला ओळखते. या महिलेवर बांगलादेशातून आलेल्या आणि सैफ अली खान हल्ला प्रकरणात अटेकत असलेल्या आरोपीला मोबाईल आणि सीमकार्ड दिल्याचा आरोप आहे.
या महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता त्या महिलेने तिचा फोन चोरील गेल्याचं पोलिसांना सांगितले. दरम्यान, सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी सात महिन्यांपूर्वी मेघालयातील दवाकी नदीमार्गे भारतात आला होता. ही नदी भारत-बांगलादेश सीमेलगत आहे. त्यानंतर हा आरोपी काही आठवडे पश्चिम बंगालमध्ये राहत होता. त्यावेळी त्याने तिथेच नाव बदलून बिजॉय दास असे ठेवले होते. पश्चिम बंगालमध्ये राहिल्यानंतर तो कामाच्या शोधात मुंबईत आला होता. मात्र, मुंबईला येण्यापूर्वी आरोपीने स्थानिक महिलेचे आधार कार्ड वापरून सीमकार्ड खरेदी केले होते.
सैफवर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम उर्फ विजय दास याला 19 जानेवारी रोजी ठाण्यातून अटक केली होती. त्याला 24 जानेवारी म्हणजेच शुक्रवारी वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार होते. सध्या सर्वत्र सैफ अली खान प्रकरणाची चर्चा रंगली आहे. तर अभिनेत्याच्या कुटुंबात भीतीचं वातावरण असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
हेही वाचा – Yavatmal News : विदर्भातील 3 लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत