मुंबई – मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड यार्डसोबत एकेकाळी केली जात होती. मात्र सध्या मुंबई पोलिसांची तुलना एखाद्या सी ग्रेड हिंदी चित्रपटातील पोलिसांसोबत करावी का? असा प्रश्न निर्माण व्हावा असा प्रसंग आज मुंबई पोलिसांवर ओढवला. सैफ अली खान हल्ला या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला कोर्टात नेत असताना पोलिसांची गाडी बंद पडली. अक्षरशः धक्का मारून गाडी सुरु करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांचे हे प्रययत्नही कामी आले नाही. संपूर्ण देशात ज्या हल्ला प्रकरणाची चर्चा होत आहे, अशा हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला कोर्टात नेत असताना हा प्रसंग घडल्याने मुंबई पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली. दरम्यान दुसरे वाहन बोलावून आरोपी मोहम्मद शहजादला कोर्टात हजर करण्यात आले.
पोलिसांचे ‘धक्कातंत्र’
सैफ अली खान हल्ल्यातील नेमका आरोपी कोण? यावरुन मुंबई पोलीस आधीच संशयाच्या भोवऱ्यात आहेत. छत्तीसगडमधुन पकडलेला तरुणचा सैफ हल्ला प्रकरणात काहीही संबंध नसल्याचे नंतर समोर आले. मात्र पोलिसी कारवाईमुळे त्याच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. त्याचे लग्न मोडले, नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. लोकलज्जेच्या भयाने तो आता घरीही परतलेला नाही असे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे.
दुसरीकडे ठाण्यातून पकडण्यात आलेला मोहम्मद शहजाद आणि सैफच्या घरात सीसीटीव्हीत कैद झालेला हल्लेखोर यांचा चेहरा जुळत नसल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरोपीचे आणि शहजादच्या हाताचे ठसेही जुळत नसल्याचेही समोर आले. त्यावर पोलिसांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे की, फिंगर प्रिंटचा रिपोर्ट आजून आलेला नाही.
त्यात आज आरोपी मोहम्मद शहजादजला वांद्रे कोर्टात हजर करण्यापूर्वी पोलिसांच्या व्हॅनमध्ये बिघाड झाला. पोलिसांनी भरबाजारात पोलिस व्हॅनला धक्का मारतानाचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. पोलिसांच्या ‘धक्कातंत्रा’नेही व्हॅन सुरु झाली नाही. अखेर दुसरे छोटे वाहन बोलावून आरोपीला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले.
हेही वाचा : Baba Siddique Murder : मी दिलेल्या नावांपैकी एकाचीही चौकशी नाही; पोलिस, मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागेल