मुंबई – एकनाथ शिंदे यांना भाजपाने विधानसभा निवडणूक 2024 नंतर सुद्धा मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळेच त्यांनी शिवसेना फोडली, असे ते खासगीत सांगतात. मी खोटं बोलत नाही, तुम्हाला तसं वाटत असेल तर त्यांना जाऊन विचारा, असे राऊत म्हणाले. पण निवडणूक झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केले. यामुळे ते अजूनही धक्क्यात आहेत, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशय एकनाथ शिंदे यांना आहे. एकनाथ शिंदे यांना 2024 विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आले, या धक्क्यातून ते अजून सावरलेले नाहीत, असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आज दैनिक सामानामधील ‘रोखठोक’ सदरातून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मनोभूमिकाचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातले सरकार हे बहुमतातले असले तरी ते एक संघ नाही. त्यात एक वाक्यता नाही. एकमेकांविरुद्ध कुरगुड्या कराचे प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करायची ताकद ज्याला बार्गेनिंग पॉवर म्हणतात ती भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे संपवली आहे. यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातला एक सरपटणारा प्राणी झाला आहे, हे स्पष्ट दिसत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
एकनाथ शिंदे अजूनही शुन्यात, धक्क्यात…
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे म्हणणं आहे की, विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री राहील अशा प्रकारचा मला वचन दिल्यामुळे मी फुटलो. असे त्यांचे आमदार खासगीत सांगत असल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी केला आहे. ते म्हणाले की, “मला 2024 नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळे मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे त्यांचं म्हणणं आहे की नाही त्यांना जाऊन विचारा मी खोटं बोलत नाही.” असंही राऊत म्हणाले.
“काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं गेलं. काही मंत्रीपद दिली, महत्त्वाची खाता दिली, उपमुख्यमंत्री पद दिले, पण एकनाथ शिंदे यांचा चेहरा आपण पाहिला असेल, त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर मी काय म्हणतो ते तुम्हाला कळेल. ते अजूनही शून्यात आहेत गुंगीत आहेत, ते धक्क्यातून सावरले नाही”. असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
हेही वाचा : Mumbai : मुंबईत नालेसफाई कामाला लवकर सुरुवात होणार, बीएमसीकडून 590 कोटींचे कंत्राट
50-55 जागा मिळाल्या हा पहिला धक्का
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, “एक तर 50, 55 जागा कशा मिळाल्या हा त्यांना पहिला धक्का आणि भाजप नेते अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळला नाही, हा दुसरा धक्का त्यांना बदला आहे. या दुःखाने ते पूर्ण कोलमडले आहेत. सरकारमध्ये पूर्णपणे त्यांची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून जो फोकस त्यांच्याकडे होता तो गेला. आता लोक त्यांच्याकडे जात नाही, लोक जातात ते फक्त पैसे मागायला जातात. कारण त्यांच्याकडे पैसे आहेत, यापुढील त्यांचे राजकारण पैसा आणि सत्ता जे आहे त्याच्यावर चालेल आणि त्यांच्याच आमदारांमध्ये चल बीचल आहे.”
शिंदे गटातील मोठा गट फडणवीसांच्या नियंत्रणात
संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे, ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या आमदारांमधील एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचे पूर्णपणे नियंत्रण आहे. शिंदे गटाच्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर त्यांचे नियंत्रण आहे. कारण देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून हे 20-25 लोक सुरतला गेले होते. एकनाथ शिंदे यांच्यासाठी ते गेले नाही. आजही त्यांच्यावर कंट्रोल फडणवीस यांचा आहे आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत. आपण पुन्हा मागे फिरायचं का? असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे.” अशी माझी माहिती असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा : Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्या घोषणा? मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच मांडली