HomeमहामुंबईमुंबईSanjay Raut : बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात ठाकरेंच्या नेत्याचे नाव, राऊतांनी म्हटले...

Sanjay Raut : बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात ठाकरेंच्या नेत्याचे नाव, राऊतांनी म्हटले –

Subscribe

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख केल्याबाबत विचारणा केली. ज्यावर उत्तर देताना खासदार राऊत सावधपणे उत्तर दिले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 ला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली. वांद्र्यात त्यांच्या मुलाच्या म्हणजेच माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर झिशान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात वडील बाबा सिद्दीकी यांची हत्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पामुळे झाल्याचा दावा केला आहे. ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्याही नावाचा समावेश आहे. याबाबत आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सावध भूमिका घेत उत्तर दिले आहे. (Sanjay Raut gave cautious reply After Thackeray Group leader was named in Baba Siddiqui murder case)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी (ता. 28 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख केल्याबाबत विचारणा केली. ज्यावर उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, या प्रकरणाची माझ्याकडे कोणती माहिती नाही. त्या विषयाशी माझा तसाही कोणता संबंध नाही. झिशान सिद्दीकी यांच्या वडिलांचे निधन झालेले आहे, आता त्यांनी काय स्टेटमेंट दिले आहे आणि पोलिसांची काय भूमिका आहे, हे पाहावे लागेल. मला माहीत नाही. मला त्या प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल. तुम्ही ज्यांची नाव घेत आहात, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय त्यावरती मी कोणताही मत व्यक्त करणार नाही, असे म्हणत राऊतांनी अत्यंत सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा… Anil Parab : आरोप करून चालणार नाही तर ते सिद्धही करा, अनिल परब यांचे झिशान सिद्दीकींना आव्हान

झिशान सिद्दीकींच्या जबाबात काय?

माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात जबाब नोंदविण्यात आला होता. पोलिसांना दिलेल्या जबाबात झिशान सिद्दीकी यांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येचा संबंध हा वांद्रेतील पुर्नविकास प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. तसेच झिशान सिद्दीकींच्या जबाबात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतल्याचाही उल्लेख आहे. अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते, पण त्यानंतर ते तसे करणार नसल्याचे लक्षात आले, असे झिशानने जबाबात म्हटले आहे.