HomeमहामुंबईमुंबईAjit Pawar : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; अजित पवार, पंकजा मुंडे...

Ajit Pawar : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला; अजित पवार, पंकजा मुंडे गुरुवारी बीड दौऱ्यावर

Subscribe

मुंबई – बीडमधील हत्याकांड प्रकरणाने राज्याचे सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनाम घेण्यासाठी दबाव वाढला आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार येत्या 30 जानेवारीला (गुरुवार) बीड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. येत्या 30 जानेवारीला पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे देखील 30 जानेवारीला बीड दौऱ्यावर आहेत. या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहणार का? याची उत्सूकता वाढली आहे.

30 जानेवारीला अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर 

अजित पवारांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते प्रथमच बीड जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या गुरुवारी, 30 जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे .या बैठकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी 10:00 वाजता ही बैठक होईल .या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. प्रत्येक विभागाचे प्रस्ताव किती, प्रलंबित प्रश्न कोणते? प्रलंबित राहण्याची कारणे काय? यावर चर्चा करण्यात आली . दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील . या संदर्भात राज्यात बैठकांचा सपाटा सुरू असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा महत्त्वाचा मानला जात आहे .

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या देखील 30 जानेवारी रोजी बीडच्या दौऱ्यावर असणार आहेत. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे बीडमधील गुन्हेगारीवर जिल्हा आढावा बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राजीनाम्यासाठी दबाव वाढला

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. संतोष देशमुख हत्याकाडांवर आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी संध्याकाळी अजित पवारांची भेट घेऊन मुंडेंच्या राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. राजीनामा घेण्याची कारणेही त्यांनी अजित पवारांना दिली. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध आहेत. याचे सर्व पुरावे दिल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवारांनी दमानियांना दिले. आता 30 जानेवारीला अजित पवार बीड दौऱ्यावर जात आहेत. तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

हेही वाचा : Danve On Karad : फरार असताना वाल्मिक कराडने ‘ते’ महत्त्वाचं काम केले; दानवेंचा मोठा दावा