HomeमहामुंबईमुंबईShiv Sena Vs Shiv Sena : उद्धव ठाकरेंना धक्का; माजी नगरसेविका राजुल...

Shiv Sena Vs Shiv Sena : उद्धव ठाकरेंना धक्का; माजी नगरसेविका राजुल पटेल यांचा शिंदे गटात प्रवेश

Subscribe

मुंबई – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची दोन्ही शिवसेनांची तयारी सुरु झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून सुरु झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या जुन्या महिला नेत्या राजुल पटेल यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत. लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करतील. उद्योग मंत्री सामंत यांचा दावा खरा होण्यापूर्वीच शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला आहे.

कोण आहे राजुल पटेल 

शिवेसना ठाकरे गटाच्या जुन्या नेत्या राजुल पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. राजुल पटेल या पक्षाच्या उपनेत्या होत्या. विधानसभा निवडणुकीत राजुल पटेल यांनी वर्सोवा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. राजुल पटेल विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेवक आहेत. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांच्याऐवजी हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली होती.

राजुल पटेल या माजी नगरसेविका म्हणून ठाकरे शिवसेनेत कार्यरत होत्या. त्याशिवाय त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा 2019 साली लढवली होती. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. मात्र आता त्यांनी ‘मातोश्री’ला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

उदय सामंत यांनी दावोस येथून एक व्हीडीओ प्रसारित करुन उद्धव ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सहभागी होतील. याची सुरुवात रत्नागिरीपासून होईल, असा दावा उदय सामंत यांनी केला होता.

राजुल पटेल यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या आधी पक्षांतर केले आहे. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. आता राजुल पटेल या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाकरे गटाच्या 55 नगरसेवकांनी आतापर्यंत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

हेही वाचा : Thackeray Shivsena : पुण्यात राऊतांसमोर माजी आमदार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले, नाराजीचं कारण अंधारे की…