मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी संसदेत आलं पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरुंवर टीका करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ते संसदेत येत होते, विरोधकांचं ऐकत होते. असं टीकास्त्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर डागले. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आज संसदेत येणार असल्यावरुन टीकास्त्र सोडले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, “पंतप्रधान मोदी यांनी संसदेची जागा बदलली. आता लग्नाच्या हॉलमध्ये संसद भरवली जाते. आज पंतप्रधान मोदी अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होणार आहेत. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आपण दिल्लीला जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.”
मध्यमवर्गीयांना खूश करण्याचा मोदींचा प्रयत्न
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केली. यावर शिवसेना ठाकरे गटाने टीका केली आहे. ठाकरे गटाचा दावा आहे की, मध्यमवर्गीयांनी मोठ्या प्रमाणात मोदींच्या विरोधात मतदान केले. मात्र मतांची चोरी करुन भारतीय जनता पक्षाने सत्ता हस्तगत केली आहे. आता भाजप आणि नरेंद्र मोदी देशातील मध्यमवर्गीयांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा फंडा त्यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समोर आणला. मात्र सुरीला मध लावून ती मध्यमवर्गीयांच्या मानेवर फिरवली असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देणार आहे. काल लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्रातील मतदर वाढीचा मुद्दा उपस्थित केला होता. शिर्डीत एकाच इमारतीत सात हजार मतदार कसे वाढले असा सावल केला होता. यावर पंतप्रधान काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : राऊतांचा खळबळजनक दावा; वर्षा बंगल्याच्या आवारात रेड्याची मंतरलेली शिंगं पुरली