HomeमहामुंबईमुंबईSanjay Raut : राऊतांचा खळबळजनक दावा; वर्षा बंगल्याच्या आवारात रेड्याची मंतरलेली शिंगं...

Sanjay Raut : राऊतांचा खळबळजनक दावा; वर्षा बंगल्याच्या आवारात रेड्याची मंतरलेली शिंगं पुरली

Subscribe

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यात राहायला का जात नाही, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. त्यांनी तिथे खोदकाम कशासाठी सुरु केले, हेही सांगितले पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतात मी वर्षा बंगल्यात जाईल मात्र तिथे झोपणार नाही. मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यात नेमकी कशाची भिती आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच रामदास कदम आणि नितेश राणे यांना लिंबू मिर्चीवाले म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याबद्दल आज आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्याच्या आवारात कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याचे शिंग पूरलेली आहेत. त्यांनी रेड्याीच मंतरलेली शिंगं वर्षा बंगल्यात पूरलेली असल्याची माहिती तिथल्या स्टाफकडून कळाले आहे. मुख्ममंत्री टिकू नये यासाठी हे केले असल्याची माहिती आहे, असाही आरोप संजय राऊत यांनी केला. वर्षाच्या बाहेरच्या लॉनवर खोदकाम करुन कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंगं पुरलेली आहेत. आम्ही तर अंधश्रद्धा मानत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे आम्ही लोक आहोत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर जाण्याला का घाबरत आहेत, हे त्यांनी सांगावे? असा सवाल राऊत यांनी केला.

रामदास कदम, नितेश राणे लिंबू-मिर्चीवाले 

राज्यात 237 आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अस्वस्थ का आहेत? त्यांचे सरकार का अस्थिर आहे, असाही सवाल त्यांनी केला. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपलीभर लिंबू निघाले होते असा आरोप केला होता. तर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मातोश्री बंगल्यावर मुख्यमंत्रीपद गेल्यापासून काळीजादू केली जात असल्याचा आरोप केला होता. यावर संजय राऊत म्हणाले, तुम्ही कोणाचे नाव घेता, ते लिंबू मिर्चीवाले आहेत.

दोन-अडीच वर्षात अंधश्रद्धेला खतपाणी

खासदार संजय राऊत यांनी आम्ही काळीजादू वगैरे काही मानत नसल्याचे सांगत, आम्ही पुरोगामी आहोत. महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे, संत गाडगेबाबा यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे. मात्र राज्यात गेल्या दोन अडीच वर्षात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे. आम्ही आमच्या पुरोगामी विचाराने हे मोडून काढत राहू, असेही संजय राऊत म्हणाले.

उदय सामंतांना राऊतांचे प्रत्युत्तर 

उदय सामंत यांनी वर्षा बंगल्यावर काही रिनोव्हेशनचे काम सुरु असल्याचे सांगितले. तसेच माध्यमांनी संजय राऊत यांना रोज सकाळी दाखवणे बंद केले पाहिजे, असेही आवाहन केले. ते म्हणाले की, ” वर्षा बंगल्यावर रिनोव्हेशनचे काही काम सुरु असेल तर त्याचे काळीजादू नावाने राजकारण करणे योग्य नाही. तुम्ही लोकांनी सकाळी त्यांना दाखवणे बंद केले तर काळीजादूही बंद होईल,” असे राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, हे कोकणातील आहेत. त्यांनी त्यांची काळीजादू करत राहावी, आम्ही आमच्या पुरोगामी विचाराने ती मोडून काढत राहू.

हेही वाचा : Sanjay Raut : फडणवीसांचे कुटुंब वर्षा बंगल्यात जायला घाबरते का? राऊतांनी का केला असा सवाल