मुंबई : मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून हवेतील प्रदूषण वाढले होते. मात्र महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या. प्रदूषण पसरवणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारतींना नोटिसा बजावल्या तर काही इमारतींचे काम रोखले. आता प्रदूषण काही प्रमाणात नियंत्रणात आले आहे. मात्र तरीही मुंबई शहराला प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्यासाठी आणखीन काही कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात 113.18 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. (Strict measures to make Mumbai an eco-friendly and pollution-free city)
मुंबई शहरात दिवसेंदिवस परप्रांतीय लोंढे येत आहेत. लोकसंख्येत आणि वाहनांच्या संख्येत सुद्धा वाढ होत आहे. त्यातच मुंबईत विविध विकासकामे चालू आहेत. त्याचबरोबर मुंबईत 2500 इमारतींची बांधकामे सुरू आहेत. तर कुठे पुलांचे काम सुरू आहे. तसेच, अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेचे सुद्धा कामे सुरू आहेत. या विकास कामामुळे हवेत धुळीचे प्रदूषण वाढले होते. त्यामुळे त्याची दखल घेत मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना केल्या. इमारत बांधकामांसाठी 28 प्रकारचे नियम लागू केले. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा सुद्ध उगारण्यात आला. मुंबईतील प्रदूषणाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. राज्यात सरकार बदलले आणि मुख्यमंत्री सुद्धा बदलले. मात्र प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुरूच आहेत.
मुंबई हवामान कृती आराखडा
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून वातावरणीय बदलांच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी अनुकूलन, नियंत्रण आणि स्थपकत्व निर्मितीच्या उपक्रमांद्वारे धोरणात्मक व समग्र उपायांवर भर दिला जात आहे. या विभागामार्फत ऊर्जा व इमारती, परस्परपूरक वाहतूक, शाश्वत कचरा व्यवस्थापन, शहरी हरितीकरण आणि जैवविविधता, वायू गुणवत्ता, शहरी पूर अजी जलसंपदा व्यवस्थापन या क्षेत्रांसंबंधी मुंबई हवामान कृती आराखड्यातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मुंबई महापालिका विविध खात्यांसोबत समन्वय साधण्यावर प्रामुख्याने भर दिला जात आहे.
हेही वाचा – Mumbai News : वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्रामुळे समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणा
वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपययोजना
- इमारत बांधकाम अथवा पाडकाम असेल तरी धूळ उडून प्रदूषण निर्माण होऊ नये यासाठी चारही बाजूने कापडी ताडपत्री अथवा लोखंडी पत्र्याने बंदिस्त करणे, अधूनमधून बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- तसेच, रस्ते धुळमुक्त करण्यासाठी रस्ते पाण्याने धुतले जात आहेत. रस्ते धुण्यासाठी 5 हजार लीटर क्षमतेचे 67 वॉटर टँकर, 9 हजार लीटर क्षमतेचे 39 वॉटर टँकर दररोज वापरले जात आहेत.
- 28 मार्गदर्शक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, क्लिनअप मार्शल आणि पालिका विभागीय अभियंता यांची 95 पथके तयार करण्यात आली आहेत.
- वायू प्रदूषण टाळण्यासाठी मिस्टिंग मशिन्स तैनात करण्यात आल्या आहेत.
- दररोज 250 किमी रस्त्यांची यांत्रिकी सफाई केली जाते.
- वायू गुवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी 5 नवीन केंद्रे आणि 4 मोबाईल व्हॅन्सची खरेदी करण्यात आली आहे.
- वातावरणात रस्त्यांवरील धुळीमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी 100 बॅटरी आधारित सक्शन मशीन (प्रती विभाग 4) खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.
हेही वाचा – Nitesh Rane : हिंदूं मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये यासाठी संघटन निर्माण करणार