Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईनवी मुंबईNavi mumbai : 'मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण' योजनेतील शिक्षकांना पाच महिन्यांनी मिळाले वेतन

Navi mumbai : ‘मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण’ योजनेतील शिक्षकांना पाच महिन्यांनी मिळाले वेतन

Subscribe

सर्व शिक्षकांनी वेतन मिळाल्याचा आनंद व्यक्त करीत विविध पुरस्काराने नावाजलेल्या नवी मुंबई महापालिकेत शिक्षक म्हणून विद्यादानाचे महत्वाचे काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल अधिक समाधान असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच दैनिक 'आपलं महानगर' चे आभार मानले.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील विविध शाळांमध्ये ‘महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण’ योजने अंतर्गत विद्या वेतन तत्वावर दाखल झालेल्या बालवाडी मदतनीस सहाय्यक शिक्षक अशी ७६ पदांसाठी भरती करण्यात आली होती. सहा महिन्याच्या कालावधीसाठी या शिक्षकांना ६ वा महिना उजाडला तरी तुटपुंजे विद्यावेतन मिळाले नव्हते. आपल्या हक्काचे वेतन मिळावे यासाठी या कर्मचार्‍यांनी पाठपुरावा केला होता. अखेर सरते शेवटी त्यांना यश आले असून ४ मार्च रोजी ४ महिन्याचे एकत्रित वेतन खात्यात जमा झाले आहे.त्यामुळे या शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.

दैनिक ‘आपलं महानगर’ ने या भावी शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी वृत्तप्रसिध्द करुन पालिका शिक्षण व जिल्हा कौशल्य योजना विभागाचे लक्ष वेधले होते.

हेही वाचा…Navi mumbai : नवी मुंबईकरांच्या समस्यांवर काँग्रेस उतरली रस्त्यावर
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सहा महिन्याच्या कालावधीसाठी सप्टेंबर महिन्यात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजने अंतर्गत पालिकेतील विविध शाळांमध्ये १६ बालवाडी शिक्षक आणि १२ मदतनीस यांना प्रति ६ हजार रुपये त्याचप्रमाणे डी.एड व पदवीधर अहर्ताधारक सहाय्यक २८ शिक्षकांना ८ हजार आणि बी.एड अहर्ताधारक सहाय्यक २० शिक्षकांना १० हजार रुपये विद्यावेतन तत्वावर सेवेत घेण्यात आले होते.

हेही वाचा…Panvel News : पनवेलकरांचे जगणे सुसह्य करा, काँग्रेसचे महापालिकेला साकडे
निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि इतर कामांसाठी या शिक्षकांची मोठी मदत झाली होती. विद्यार्थ्यांमध्ये देखील या शिक्षकांमुळे उत्साहाचे वातावरण पसरले होते. पदरमोड करून या शिक्षकांनी पाच महिने प्रामाणिकपणे आपले काम सुरू ठेवले आहे. मात्र चार महिन्याचे वेतन मिळत नसल्याने या शिक्षकांनी आपल्याला हक्काचे वेतन मिळावे याकरिता संघर्ष सुरू केला. पालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त शिक्षणाधिकारी त्याचप्रमाणे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात वेतनाच्या प्रश्नासह पालिकेतील शिक्षकांची कमतरता लक्षात घेता यापुढे देखील संधी द्यावी याकरिता निवेदन दिले होते. तब्बल महिनाभर या शिक्षकांनी आपला संघर्ष सुरू ठेवल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. ४ मार्च रोजी या सर्व शिक्षकांना चार महिन्याचे वेतन आदा करण्यात आले असून उर्वरित दोन महिन्याचे वेतन एकत्रितपणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.