HomeमहामुंबईमुंबईBmc Budget : मुंबईकरांना दिलासा, निवडणुकीमुळे अर्थसंकल्पात यंदा कोणतीही करवाढ अथवा दरवाढ...

Bmc Budget : मुंबईकरांना दिलासा, निवडणुकीमुळे अर्थसंकल्पात यंदा कोणतीही करवाढ अथवा दरवाढ नाही

Subscribe

मुंबई महापालिकेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांना 3 किंवा 4 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ अथवा दरवाढ होण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट संकेत मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

मुंबई (मारुती मोरे) : मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांना 3 किंवा 4 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ अथवा दरवाढ होण्याची शक्यता नाही, असे स्पष्ट संकेत मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (There is no tax or price hike in the budget this year due to the Mumbai Municipal Corporation elections)

महापालिकेची निवडणूक पाहता राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत सध्या दोन लाख कोटी रुपयांची विकासकामे हाती घेतली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विविध बँकांतील मुदत ठेवी 92 हजार कोटी रुपयांवरून 81 हजार कोटींवर आल्या आहेत. दुसरीकडे कंत्राटदारांची दोन लाख कोटी रुपयांची बिले चुकती करावी लागणार आहेत. तर, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन, निवृत्त कर्मचारी यांची कोट्यवधी रुपयांची थकीत देणी चुकती करण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे ठाकले आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

हेही वाचा – Coastal Road : कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंक जोडणारा उत्तर वाहिनी पूल वाहतुकीसाठी होणार खुला

निवडणुका तोंडावर आल्याने पालिकेने प्रस्तावित केलेली 8 टक्के पाणी दरवाढ थांबवली आहे. तसेच, कोणत्याही पद्धतीची दरवाढ केल्यास त्याचा निवडणूक आणि मतदानावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता राज्यातील सत्ताधारी शिवसेना व भाजपा प्रणित महायुती सरकार महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोणत्याही पद्धतीची कर वाढ अथवा दरवाढ करणार नाही. याबाबतचे स्पष्ट संकेत महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना अर्थसंकल्प सादर होईपर्यंत तूर्तास दिलासा मिळणार आहे. मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पुढील काळात पालिकेकडून पाणी दरवाढ, मालमत्ता करवाढ लादली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

यंदाच्या सूचनांमध्ये बेस्टशी संबंधित सूचनांचा पाऊस

दरम्यान, श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेने आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याआधी मुंबईकरांकडून लेखी सूचना मागवल्या होत्या. पालिकेच्या आवाहनानंतर बेस्टशी संबंधित सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. कारण चालू अर्थसंकल्पात बेस्टसाठी 800 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत 737 कोटी रुपये देण्यात आले आहेत. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाची दुर्दशा झाली आहे. बेस्ट उपक्रमाचा तोटा वाढत चालला आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला पालिका प्रशासनाने अनुदान द्यावे, तसेच बेस्ट उपक्रमाला आर्थिक गर्तेतून सावरण्यासाठी बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करावा, अशा मागण्या अनेक वर्षांपासून होताना दिसत आहेत. मात्र पालिका प्रशासनाने बेस्टची संपूर्ण जबाबदारी नकार घेण्यास तयार नाही. तसेच भाडेतत्वावरील गाड्यांमुळे बेस्ट उपक्रमाचे नावही खराब होत आहे. कारण मागील काही दिवसात भाडेतत्वावरील बेस्ट गाड्यांचे अनेक अपघात झाले आहेत. त्यातच बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदी कोणीही अधिकारी येण्यास तयार नाही. त्यामुळे बेस्ट कारभारात सुधारणा व्हावी, यासाठी नागरिकांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. नागिराकांच्या सूचना लक्षात घेऊन पालिकेकडून यंदा बेस्टला किती अनुदान मिळणार? हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Mumbai News : महापालिकेने 100 दिवसांत 100 शौचालयांची दुरुस्ती करावी; पियूष गोयल यांच्याकडून आवाहन