Homeक्राइमCrime : सोन्याचे दागिने पळविणार्‍या वयोवृद्धेसह दोघांना अटक

Crime : सोन्याचे दागिने पळविणार्‍या वयोवृद्धेसह दोघांना अटक

Subscribe

विविध भूलथापा देऊन पादचार्‍यांचे विशेषतः वयोवृद्धांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेसह दोघांना एमएचबी पोलिसांनी अटक केली. समीर नासीर शेख आणि लता दशरथ पवार अशी या दोघांची नावे आहेत.

अरूण सावरटकर

मुंबई : विविध भूलथापा देऊन पादचार्‍यांचे विशेषतः वयोवृद्धांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेसह दोघांना एमएचबी पोलिसांनी अटक केली. समीर नासीर शेख आणि लता दशरथ पवार अशी या दोघांची नावे आहेत. (two arrested, including an elderly woman for stealing gold jewellery)

अटक करण्यात आलेले दोघेही परभणीच्या फासेपारधी काळे-पवार टोळीचे सदस्य आहे. त्यांच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा – Buldhana Hair Loss : बुलढाण्यात ‘केस गळती’ सुरूच; दिल्ली, चेन्नईतील डॉक्टरांची पथकं करणार पाहणी

या प्रकरणी बोरिवलीतील एका महिलेने तक्रार नोंदवली. दोन दिवसांपूर्वी ती तिच्या नातवाला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. शाळेतून घरी येताना तिला एका महिलेसह दोघे भेटले. या दोघांनी तिला मोफत बिस्कीट देण्याचा बहाणा करून, भूलथापा मारत तिच्याकडील सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. हा प्रकार लक्षात येताच तिने एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगत दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास करण्यास सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी काही तासांत बोरिवली येथून समीर शेख आणि लता पवार या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

ते दोघेही काळे-पवार टोळीशी संबंधित असून ही टोळी मूळची परभणी, बीडची आहे. या टोळीचा म्होरक्या शैलेश दशरथ पवार असून सध्या तो कारागृहात आहे. लता ही त्याची आई तर समीर त्याचा सहकारी आहे. त्यांच्याकडून चोरीचे सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. या टोळीविरुद्ध मुंबईसह इतर ठिकाणी अनेक फसवणुक गुन्हे दाखल आहे. रविवारी दुपारी त्यांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

हेही वाचा – Sanjay Raut : फडणवीसांनी दोन महिन्यात जे कमावले ते…संजय राऊत यांची टीका


Edited by : Ashwini A. Bhatavdekar