HomeमहामुंबईमुंबईUnion Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्या घोषणा? मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच मांडली

Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्या घोषणा? मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीच मांडली

Subscribe

मुंबई : नव्या वर्षात अनेकांचे लक्ष हे देशाच्या अर्थसंकल्पाकडे लागले होते. अखेर शनिवारी (1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थासंकल्प 2025-26 सादर केला. यामध्ये समाजातील सर्व घटक पक्षांसाठी केंद्र सरकारने अनेक घोषणा केल्या असून नोकरदारांना 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत असल्याचे जाहीर केले. तसेच, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बिहारसाठी विविध योजनांचा उल्लेख बजेटमध्ये असताना महाराष्ट्रासाठी भरीव तरदूत केली नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. यानंतर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पाने काय दिले आहे? यासंदर्भात आकडेवारीच मांडली आहे. (Union Budget 2025 Maharashtra CM Devendra Fadnavis reaction)

हेही वाचा : Union Budget 2025 : हे सरकार खोटी स्तुती करण्यात मग्न, अर्थसंकल्पाबद्दल काय म्हणाले मल्लिकार्जून खर्गे?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय दिले आहे? याची आकडेवारी मांडली आहे. “यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांसाठी ‘ड्रीम बजेट’ ठरला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रथम आभार.” असे म्हणत त्यांनी आभार मानले. त्यानंतर त्यांना महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काय मिळाले? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी 4004.31 कोटी तसेच मुंबई मेट्रोसाठी 1255.06 कोटींची तरदूत करण्यात आली आहे. तसेच, मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टसाठी 511.48 कोटी देण्यात आले आहेत. याशिवाय पुणे मेट्रोसाठी 699.13 कोटी देण्यात आले आहेत.” अशी माहिती त्यांनी दिली.

आकडेवारी मांडताना मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत 230 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला देण्यात येणार आहे. महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हीटी इम्प्रुव्हमेंट प्रकल्पासाठी 683 कोटी, महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस प्रकल्पासाठी 100 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1094 कोटी, उपसा सिंचन योजनांसाठी 186 कोटी अशा तरतुदी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळ सुधारणांसाठी 683 कोटी 51 लाख, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी 596 कोटी 57 लाख, ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी 186 कोटी 44 लाख, इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी 652 कोटी 52 लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी 1094 कोटी 58 लाख रुपयांचा निधी राज्याला देण्यात आले आहे,” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, ही फक्त प्राथमिक आकडेवारी असून विविध मंत्रालयांची तरतूद तसेच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.