Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनAtul Parchure : चाहत्यांपैकी एक मी पण...; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अतुल परचुरे यांना भावांजली

Atul Parchure : चाहत्यांपैकी एक मी पण…; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अतुल परचुरे यांना भावांजली

Subscribe

अतुल परचुरे यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर विविध राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई : मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनोरंजन क्षेत्राला धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (veteran marathi actor atul parchure died cm eknath shinde dcm fadnavis dcm pawar paid tribute special message)

अतुल परचुरे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मालिका, चित्रपट किंवा नाटक विश्वात स्वतःचा ठसा उमटवला. मराठीतच नव्हे तर हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांचं करिअर अत्यंत उत्तमरित्या सुरू असतानाच त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, या कठीण प्रसंगावर मात करत अतिशय जिद्दीने ते पुन्हा एकदा काम करण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र, तब्येतीने त्यांची साथ दिली नाही. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर विविध राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा – Atul Parchure : ज्येष्ठ अभिनेता अतुल परचुरे यांचे निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा

चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट झाल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परचुरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे, कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरून येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (veteran marathi actor atul parchure died cm eknath shinde dcm fadnavis dcm pawar paid tribute special message)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परचुरे यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्याचे सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एक प्रतिभावंत, हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा – Maharashtra Weather : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; मुंबईलाही वादळी वाऱ्याचा इशारा

अतुल परचुरे यांनी नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही प्रकारांमध्ये आपली छाप पाडली होती. अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून कधीही न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे. (veteran marathi actor atul parchure died cm eknath shinde dcm fadnavis dcm pawar paid tribute special message)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar