मुंबई : मुंबई महापालिका संचालित सायन रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हृदयविकाराशी संबंधित चाचणीसाठी येणाऱ्या रूग्णांना ‘टू डी कार्डियोग्राफी अँड कलर डॉप्लर मशीन’च्या उपलब्धतेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. माजी खासदार डॉ. कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून ‘टू डी कार्डियोग्राफी अँड कलर डॉप्लर दोन मशीन’ उपलब्ध झाल्या आहेत. मशीनच्या उपलब्धततेमुळे हृदयरोगाशी संबंधित रूग्णांच्या चाचणीसाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. कार्डिओलॉजी विभागातील संयंत्रांचे लोकार्पण डॉ. कुमार केतकर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
याप्रसंगी उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, सायन रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रताप नाथानी आदी उपस्थित होते. (Waiting period for heart disease patients to get tests at Sion Hospital will be reduced)
सायन रूग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागात दररोज सरासरी 100 ते 150 रुग्णांच्या टू डी इको चाचणी करण्यात येतात. नव्याने उपलब्ध झालेल्या संयंत्रांमुळे दिवसापोटी अधिकच्या टू डी इको चाचण्या करणे शक्य होणार आहे. हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, हृदयाशी संबंधित व्हॉल्व्हचे आजार, कॅथलॅब येथे होणाऱ्या चाचणीसाठी ही संयंत्रे उपयुक्त ठरणार आहेत. उपलब्ध टू डी कार्डियोग्राफी अँड कलर डॉप्लर संयंत्रांपैकी एक संयंत्र अतिदक्षता विभाग (आयसीयू) करिता ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आपत्कालीन कक्षात येणाऱ्या रूग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. या संयंत्रांच्या उपलब्धततेमुळे हृदय विकारासाठी दाखल होणाऱ्या रूग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्यर होईल.
हेही वाचा – BMC : जकातची भरपाई महापालिकेचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत, वर्षाखेर मिळणार 14,398 कोटींचे उत्पन्न
ट्रान्स इसोफेजिअल इको प्रोब
हृदयविकाराशी संबंधित अतिशय जटील चाचण्यांमध्ये निदान करण्यासाठी संयंत्रांसह ‘ट्रान्स इसोफेजिअल इको प्रोब’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे हृदयाच्या मागील बाजूने चाचणी करणे शक्य आहे. थ्रीडी इको, ट्रान्स इसोफेजिअल इको आदी चाचण्या माफक दरात करणे शक्य होणार आहे. यामुळे रूग्णांचा चाचणी करण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधीही कमी होणार आहे.
हेही वाचा – PM Modi in Rajya Sabha : कॉंग्रेसने मंगेशकरांना सावरकर प्रेमाचे गिफ्ट दिले, काय म्हणाले पंतप्रधान मोदी –