मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवार, 15 जानेवारी रोजी मुंबई तसेच नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे शहरातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. मात्र, अशा मोठ्या नेत्यांच्या दौऱ्यांसाठी सामान्य मुंबईकराला वेठीला का धरता, असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (why the common mumbaikar was being cornered for the visits of leaders asks aaditya thackeray criticises vip tours)
भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणाऱ्या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार असून यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, महायुतीच्या सत्तास्थापनेनंतर पंतप्रधान मोदी हे दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर येत असून यावेळी ते महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. यावेळी दोन तासाच्या या बैठकीसाठी महायुतीमधील सर्व मंत्री आणि आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश आधीच देण्यात आले आहेत.
To block the traffic on working days in Mumbai. Lakhs of people getting late to office, stuck on the Western Express Highway.
Why can’t these events where VIPs who block traffic for more than 20 mins be on weekends? Why select working days?
Or use the helicopter to reach…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 15, 2025
वर्किंग डेजमध्ये ट्रॅफिक 20 मिनिटांसाठी थांबवणे म्हणजे लाखो लोकांना कामावर पोहोचायला उशीर होतो, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीदेखील होते. अशा VIP दौऱ्यांमुळे जर वाहतूक कोंडी होत असेल तर असे कार्यक्रम वीकेंडला का ठेवले जात नाहीत, असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. किंवा मग निवडणुकीच्या काळात ज्याप्रमाणे हेलिकॉप्टरचा वापर करता, तसाच यावेळी देखील करत जा, म्हणजे वाहतुकीचा बोजवारा उडणार नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. मोठ्या नेत्यांच्या दौऱ्यामुळे मुंबईकरांनी का त्रास सहन करायचा असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
हेही वाचा – Road Accident : गेल्या 3 वर्षांत रस्ते अपघातांमध्ये इतकी वाढ, चिंता वाढली
नवी मुंबईतील वाहतुकीत होणार हे बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त ओवे गाव पोलीस ठाणे ते जे कुमार सर्कल तसेच ग्रीन हेरीटेज येथे दोन्ही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. असे असले तरीही या काळात VIP वाहने, पोलीस वाहने तसेच आपत्कालीन वाहनांचा प्रवेश मात्र या मार्गावर सुरुच राहणार आहे. तसेच, या मार्गावरील वाहतूक ही दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आली आहे. तसेच, गुरुद्वारा चौक ते जे. कुमार सर्कल मार्गे बी.डी. सोमाणी शाळा, आणि इस्कॉन मंदिराच्या गेट क्रमांक 1 आणि गेट क्रमांक 2 हे रस्ते फक्त व्हीआयपींसाठी खुले ठेवले जाणार आहेत.
हेही वाचा – या सगळ्यात होरपळणार तर जनताच, रुपयाच्या अवमूल्यनावरून ठाकरे गटाकडून मोदी सरकारवर टीका