मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्यावर्षी वांद्रे येथील त्यांच्या कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रावरुन त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, पोलीस योग्य काम करत नाहीत, असा आरोप केला आहे. तसेच झिशान म्हणाले की, आपण ज्या बिल्डर्सची संशयित म्हणून नावे घेतली, त्यातील एका बिल्डरलाही मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी देखील बोलावले नाही. उद्या माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर हल्ला झाला तर त्यासाठी मी नावे घेतली तेच लोक जबाबदार राहतील. मात्र पोलिस या बिल्डर्सला पुन्हा निर्दोष सोडतील अशी संतापजनक प्रतिक्रिया झिशान सिद्दीकी यांनी दिली आहे.
मी दिलेल्या बिल्डर्सची चौकशी का नाही? – झिशान सिद्दीकी
झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे की, त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे रोज डायरी लिहित होते. त्यांचे काही बिल्डर्ससोबत वाद होता. या बिल्डर्सची नावे पोलिसांकडे दिली आहेत. पण मला आश्चर्य वाटतं की पोलिसांनी यापैकी एकालाही साधं चौकशीसाठी कधी बोलावले नाही. त्याचे उत्तर पोलिसांना कोर्टात द्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याचे उत्तर द्यावं लागेल, असंही झिशान सिद्दीकी म्हणाले.
झिशान सिद्दीकींचा आरोप आहे त्यांनी ज्या 11 बिल्डर्सची नावे दिली त्यांची पोलिसांनी चौकशी का केली नाही, याचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनाही विचारणार आहे. मी काही आमदार नाही. त्यामुळे माझं सरकार नाही. मी एक कार्यकर्ता आहे. मला जे वाटतं ते मी माझे नेते अजित पवारांना सांगेल. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे योग्य प्रकारे चौकशी करतील, असे वाटते. माझ्या जीवाला धोका झाला तर त्याला मी नावे दिलेले बिल्डरच जबाबदार असेल, असा दावाही त्यांनी केला. आता जर चौकशी होत नसेल तर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यासारखं होईल, असेही झिशान यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : Dhananjay Munde : अंजली दमानियांचे ऑफस ऑफ प्रॉफिटचे आरोप धनंजय मुंडेंनी टोलवले; म्हणाले…