Homeमहामुंबईनवी मुंबईPanvel News : उलवेमध्ये नमो चषकाचा झंझावात, 5 हजारांहून अधिक खेळाडू, 15...

Panvel News : उलवेमध्ये नमो चषकाचा झंझावात, 5 हजारांहून अधिक खेळाडू, 15 लाखांचे पुरस्कार

Subscribe

पनवेल : नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, रायगडसह संपूर्ण राज्याचे लक्ष गुरुवारपासून (23 जानेवारी) तीन दिवस उलवेमधील ‘नमो चषक’ स्पर्धेकडे लागून राहणार आहे. 5 हजार खेळाडूंचा सहभाग आणि तब्बल 15 लाखांचे पुरस्कार असलेली ही स्पर्धा आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता उलवा नोडमधील सेक्टर 12 मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या मागील मैदानावर होणाऱ्या नमो चषक स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा…  Nana Patole : दावोसला जाऊनही मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्राच्या कुजबुजकडे लक्ष, पटोलेंची टीका

भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरण यांनी 23, 24 व 25 जानेवारी असे तीन दिवस नमो चषकाचे आयोजन केले आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रांत पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, नमो चषकाचे मुख्य आयोजक परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सुनील राणा, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, उलवे नोड अध्यक्ष अमर म्हात्रे, उलवे 1 अध्यक्ष निलेश खारकर, उलवे 2 अध्यक्ष विजय घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हे खेळ आणि ही बक्षिसे

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांना 7 लाख 56 हजार रुपये, खो-खोमधील एकूण विजेत्यांना 1 लाख 43 हजार 200 रुपये, कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांना 1 लाख 81 हजार रुपये तर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील विजेत्यांना 4 लाख 11 हजार रुपये अशी एकूण तब्बल 14 लाख 91 हजार 200 रुपयांची रक्कम आणि चषक देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश आहे.

या खेळांचा सहभाग

शरीरसौष्ठव स्पर्धा, खो-खो, कबड्डी, धावणे, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडा फेक या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत 5 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 23 जानेवारीला, कबड्डी 24 तर खो-खो 25 जानेवारीला होणार आहे. या तिन्ही प्रकारच्या स्पर्धा प्रकाशझोतात तर धावणे, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडा फेक या स्पर्धा तीनही दिवस दिवसा होणार आहेत.

(Edited by Avinash Chandane)