Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईनवी मुंबईNavi Mumbai news : संदीप नाईकांचा अस्तित्वासाठी ‘जनसंवाद’!

Navi Mumbai news : संदीप नाईकांचा अस्तित्वासाठी ‘जनसंवाद’!

Subscribe

वनमंत्री गणेश नाईक हे पक्षश्रेष्ठीच्या आदेशनुसार सक्रीय झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षाची वाटचाल सुरु आहे. संदीप नाईक भाजपचे घटक नाहीत. त्यांना त्यांचे राजकीय अस्तित्वात टिकवायचे आणि चर्चेत राहायचे आहे. त्यामुळे त्यांनी ‘जनसंवाद’ सुरु केला असावा. -रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष (भाजप)

नवी मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांचा नवी मुंबईत ‘जनता दरबार’ पार पडला. मंत्री नाईकांच्या या जनता दरबाराला तुतारी हाती घेतलेले वनमंत्री नाईकांचे सुपुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी ‘जनसंवाद’ उपक्रमातून उत्तर दिल्याची चर्चा सुरु आहे. संदीप नाईकांनी बेलापूर येथील जनसंपर्क कार्यालयात जनसंवादातून पुन्हा सक्रियता दर्शवत आपल्या अस्तित्वासाठी धडपड सुरु केल्याचे दिसत आहे.

हेही वाचा…WHO : या 7 देशांतील हवा सर्वाधिक स्वच्छ, WHO च्या यादीनुसार भारताची काय परिस्थिती?
ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री असताना गणेश नाईक यांनी जनता दरबाराची प्रथा सुरु केली. १३ वर्ष भरणारा हा जनता दरबार २०१४ च्या पराभवानंतर खंडित करण्यात आला होता. मात्र वनमंत्री झाल्यानंतर आमदार गणेश नाईक यांनी पुन्हा जनता दरबार सुरु केला. वाशीतील विष्णूदास भावे नाटयगृहात ३ व २८ फेब्रुवारी २०२५ रोजी तसेच ठाण्यात २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जनता दरबार पार पाडला. या दोन्ही जनता दरबारात नाईक यांचे दुसरे सुपुत्र माजी खा.संजीव नाईक यांनी त्याची धुरा सांभाळत त्यांनी साथ दिली आहे.

हेही वाचा…‘चारवेळा संधी दिली, कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही, हिंमत असती, तर..’, काँग्रेसच्या नेत्याने सगळा इतिहास काढला
दरम्यान गणेश नाईक आणि भाजपची साथ सोडत त्यांचे सुपुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराजी नाटयानंतर समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करीत तुतारी हाती घेतली, आणि महाविकास आघाडीतून त्यांनी बेलापूरमधून निवडणुकही लढवली. मात्र त्यांना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पराभूत केले.

महायुतीची सत्ता आल्यानंतर आमदार गणेश नाईकांची वनमंत्री आणि पालघर जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून लॉटरी लागली. तुतारी हाती घेतना संदीप नाईकांसोबत असणार्‍या त्यांच्या साथीदारांनी साथ सोडत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. सोमवार १० मार्च २०२५ रोजी बेलापूर येथील कार्यालयात संदीप नाईकांनी ‘जनसंवाद’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या उपक्रमाला तितकीशी गर्दी जमली नव्हती. त्यामुळे माजी आमदार संदीप नाईक एकाकी पडल्याचे दिसत आहे. जनसंवादच्या माध्यमातून त्यांनी सक्रीयता सुरु केली असली तरी ते पुन्हा भाजपमध्ये येतील, अशी चर्चा सुरु आहे.