Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईनवी मुंबईPanvel News : पनवेलमध्ये रंगला आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांचा कौतुक सोहळा

Panvel News : पनवेलमध्ये रंगला आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांचा कौतुक सोहळा

Subscribe

पनवेल : परेश ठाकूर अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ आंतरशालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात झाला. 16 विद्यालये, तब्बल 15 हजार 896 विद्यार्थी स्पर्धकांचा सहभाग, तीन फेऱ्यांची चाचणी आणि यातून 45 विजेत्यांची निवड अशी ही स्पर्धा झाली. यावेळी सर्व विजेत्यांच्या पाठीवर लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुकाची थाप मारून त्यांना प्रोत्साहन दिले. पारितोषिक वितरण समारंभ पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला. या निमित्ताने विद्यार्थ्यांना ‘आज्जीबाई जोरात’ या पहिल्या एआय महाबालनाट्याचा प्रयोग दाखवण्यात आला.

हेही वाचा…  Devendra Fadnavis : ‘एका व्यक्तीने दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी विवाह करणे गैर नाही, पण…’, लव्ह जिहादविरोधात फडणवीस आक्रमक

वक्तृत्व स्पर्धेतून नेतृत्वगुणाचा विकास, या उद्देशाने कोशिश फाउंडेशनने ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. पारितोषिक वितरण समारंभासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, महापालिकेचे शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण, भाजपचे जिल्हा चिटणीस अमरिश मोकल, स्पर्धा प्रमुख व मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, अक्षय सिंग, कोशिश फाऊंडेशनचे सचिव अॅड. चेतन जाधव, खजिनदार अभिजित जाधव, सदस्य सत्यवान नाईक, प्रीतम म्हात्रे, गणेश जगताप, स्पर्धा समन्वयक अयुफ अकुला आदी उपस्थित होते.

विजेत्यांना पुरस्कार देताना अभिनेते जयवंत वाडकर सोबत आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, अविनाश कोळी

वक्तृत्व विकास महत्त्वाचा

पाल्यांमध्ये सभाधीटपणा येण्यासाठी पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे असते. पनवेल परिसराला मोठे भवितव्य आहे आणि युवा पिढी घडवण्यासाठी वक्तृत्व विकास महत्त्वाचा आहे. या अनुषंगाने या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला पंख देण्याचे काम होत आहे.
– प्रशांत ठाकूर, पनवेल

‘कोशिश’चे काम सुरूच राहणार

कोशिश फाऊंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, नेतृत्वगुणाला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवले गेले आहेत. यापुढेही असे विविध उपक्रम आणि प्रकल्प राबविले जातील.
– परेश ठाकूर, अध्यक्ष, कोशिश फाऊंडेशन

‘आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेतील गटनिहाय विजेते खालीलप्रमाणे

इयत्ता दहावी (मराठी)

  1. समृद्धी श्रीकांत मोरे
  2. श्रेया अनिल सोलणे
  3. यथार्थ संदीप दुबे

इयत्ता नववी (मराठी)

  1. सुकन्या रवीकरण पायघन
  2. अनुष्का संतोष गिड्डे
  3. आदित्य नागेश तरडे

आठवी गट (मराठी)

  1. वेदांत नितीन शिंदे
  2. आर्या जनार्दन मोरे
  3. मानव मधू मंगल

इयत्ता सातवी (मराठी)

  1. अधिराज विनोद गाडे
  2. अमृता भारत ढोले
  3. गार्गी मिताली म्हात्रे

इयत्ता दहावी (इंग्रजी)

  1. श्रावणी रिकामे
  2. श्रेया बुकटे
  3. कनिश म्हात्रे

इयत्ता नववी (इंग्रजी)

  1. आर्या निलेश तेलगे
  2. राशी विनोद गुप्ता
  3. अनित्य राजू संगीता

इयत्ता आठवी (इंग्रजी)

  1. मान्यता अनुमोले
  2. लावण्या सोनावणे
  3. दर्शन नरवडे

इयत्ता सातवी गट (इंग्रजी)

  1. ऋतुजा आप्पासाहेब चव्हाण
  2. निर्मयी संदीप फुलसुंदर
  3. हृदयांश निलेश अब्बीराव
महापालिका शाळा

इयत्ता पहिली गट

  1. फातिमा इनामदार
  2. सावली पाटील
  3. आर्यन ताज

इयत्ता दुसरी गट

  1. खादीजा खान
  2. साजिदा शेख
  3. कुसुम राजपुरोहित

इयत्ता तिसरी गट

  1. मेघना
  2. अनुष्का प्रजापती
  3. कालसा कोळी

इयत्ता चौथी गट

  1. आनंद परमार
  2. कीर्ती चक्वदिय
  3. सिद्रा सय्यद

इयत्ता पाचवी गट

  1. आसावरी लाड
  2. दुर्वा मांडवकर
  3. डॉली यादव

इयत्ता सहावी गट

  1. महेंद्र कोळी
  2. स्वरा भोईर
  3. पारस लुहा

इयत्ता सातवी गट

  1. देवराज कालसगेरा
  2. प्रियांशी पवार
  3. फलकिन्शा अन्सारी

(Edited by Avinash Chandane)