आपलं महानगर / पनवेल
पनवेल महापालिकेच्यावतीने नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याच्या उद्देशाने खारघर येथील केंद्रीय विहार जवळील प्राईड इमारतीच्या तळमजल्यावर मालमत्ता कर संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे. पालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उद्घाटन आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपायुक्त बाबासाहेब राजळे, सहायक आयुक्त स्वरूप खारगे, प्रभाग अधिकारी स्मिता काळे, प्रभारी कर अधीक्षक सुनील भोईर, महेश गायकवाड, प्रभारी अधिक्षक जितेंद्र मढवी आणि कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा… Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या 10 टक्के जागा अल्पसंख्याक समाजासाठी राखीव; अजित पवारांनी मराठवाड्यात केली घोषणा
मालमत्तांधारकांच्या बिलांमधील अडचणी लक्षात घेऊन, त्या सोडविण्यावरती महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने भर दिला आहे. नागरिकांना कर भरणे सोपे जावे, त्यांच्या मालमत्ता कराच्या बिलामध्ये दुरूस्ती व्हावी, तक्रारींचे निवारण लवकर व्हावे तसेच पालिका मुख्यालयात येण्या-जाण्याचा वेळ वाचावा या उद्देशाने हे मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. मालमत्ता कर भरण्याची सुविधा यापूर्वी प्रभाग समितीमध्ये देण्यात येत होती परंतू नागरिकांना अधिक सोयीचे व्हावे यासाठी हे कर संकलन केंद्र सुरू केले आहे.दर शनिवारी महापालिकेस साप्ताहिक सुट्टी असली तरी देखील मालमत्ता कराचे धनादेश स्वीकारण्याची सुविधा पालिका मुख्यालयात सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी केले आहे.
हेही वाचा… Praniti Shinde : लाडक्या बहिणींना विकत घेणार का?, प्रणिती शिंदेंचा सरकारला सवाल
2 टक्के सवलत, मोबाईल ॲप ऑनलाईन कर भरणा केल्यास 2 टक्के सवलत देण्यात येत आहे.नागरिकांना ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येत आहे. लवकरात लवकर नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरुन सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.