Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईनवी मुंबईUran News : 6 वर्षांची चिमुरडी अन् 6 तास 5 मिनिटांचे पोहणे, उरणच्या परिधी घरतचा विक्रम

Uran News : 6 वर्षांची चिमुरडी अन् 6 तास 5 मिनिटांचे पोहणे, उरणच्या परिधी घरतचा विक्रम

Subscribe

उरण : परिधी प्रमोद घरत या 6 वर्षांच्या चिमुरडीच्या पराक्रमाचे सध्या उरण तालुक्यासह रायगडमध्ये कौतुक होत आहे. या बालिकेने घारापुरी बंदर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी 12 किलोमीटर अंतर अवघ्या 6 तास 5 मिनिटात पोहून पूर्ण केले आहे. त्यामुळे उरणचे आमदार महेश बालदी यांनी परिधी आणि तिच्या कुटुंबीयांचे कौतुक केले आहे. यावेळी भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, माजी उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, उरण शहराध्यक्ष कौशिक शाह, माजी नगरसेवक नंदू लांबे, माजी नगरसेवक राजेश ठाकूर, हितेश ठाकूर, प्रमोद घरत आदी उपस्थित होते.

हेही वाचा…  Murud News : मुरुडमधील 2 किमीचा रस्ता 2 वर्षे का रखडला, कंत्राटदारावर कुणाची मेहरबानी

परिधी घरत हिने घारापुरी बंदरातून अरबी समुद्रात पहाटे 4 वाजून 38 मिनिटांनी झेप घेतली. त्यानंतर काळोखातून तिने फेसाळलेल्या लाटांवर स्वार होत गेट वे ऑफ इंडिया गाठले. त्यासाठी तिला जेएनपीटी बंदरात आलेल्या मोठ्या जहाजांमधून, डॉल्फीन माशांमधून मोठ्या कौशल्याने वाट काढावी लागली. या सर्व संकटांवर मात करत बुधवारी (4 फेब्रुवारी) परिधीने विक्रम प्रस्थापित केला. परिधीची जलतरणाची आवड आणि तिची जिद्ध यामुळेच हे शक्य झाले, असे तिच्या पालकांनी तिच्या यशाबद्दल सांगितले.

उरणचे आमदार महेश बालदी यांनी परिधी घरत आणि त्याच्या पालकांचे कौतुक केले

हेही वाचा…  ST Corporation Chairmanship : फडणवीसांचा शिंदेंना धक्का, सरनाईकांकडून एसटीचं स्टिअरिंग हिसकावलं

उरण एज्युकेशन स्कुलमध्ये पहिलीमध्ये शिकणाऱ्या परिधीला लहानपणापासून पोहण्याची आवड आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात मुले साहस-धाडस करतात तेव्हा त्यांच्या पालकांची छाती अभिमानाने भरून येते. परिधीने जलतरणातील तिचे कसब पणाला लावत पहिल्या प्रयत्नात घारापुरी बंदर ते गेटवे ऑफ इंडिया अंतर पार केले. यासाठी तिने वर्षभर सराव केला होता. उरण नगरपरिषदेच्या जलतरण तलावात एक वर्ष सराव करताना ती रोज चार तास कसून पोहण्याचा सराव करत होती. कठोर मेहनत आणि जिद्धीच्या बळावर तिने 12 किलोमीटरचे अंतर 6 तास 5 मिनिटांत पूर्ण करून विक्रम करून दाखवला.

नवे विक्रम करण्याचे लक्ष्य

जलतरणाच्या माध्यमातून भविष्यात आणखी मोठ्या विक्रमांना गवसणी घालायची आहे.
– परिधी घरत, जलतरणपटू

(Edited by Avinash Chandane)