मुंबई – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे. संतोष देशमुख यांना झालेल्या मारहणीचे आणि त्यांच्यासोबत झालेल्या अमानुष वागणुकीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर जनतेतून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो व्हिडिओ मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन महिन्यांपासून होते, त्यांनी ते पाहिले नाही का? हे सरकारच बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी विरोधक आमदार मोठ्या संख्येने विधिमंडळाच्या पाऱ्यांवर जमा झाले. त्यांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर थोडयाच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला असल्याचे म्हटले.
महायुती सरकारच बरखास्त केले पाहिजे – आदित्य ठाकरे
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांसोबत बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. संतोष देशमुख यांचे काल समोर आलेले फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना आहेत. मुख्यमंत्र्यांकडे हे फोटो दोन महिन्यांपासून होते, त्यांनी ते पाहिले नाही का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. या सरकारमध्ये नैतिकता राहिलेली नाही, महायुती सरकारच बरखास्त केले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
राजकारण एवढं घाणेरडं झालं आहे!
आदित्य ठाकरे यांनी सरकारमधील मंत्र्यांचे गेल्या काही दिवसांतील वक्तव्यांचाही समाचार घेतला, ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राजकारण एवढं घाणेरडं झालं आहे, कधी सरपंचांना सांगतात तुम्हाला निधी देणार नाही. तुम्हाला अधिकार देणार नाही. हेच सरकार एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही का? असा सवाल आमदार ठाकरेंनी केला.
संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते, त्यांच्या कार्यकर्त्याला न्याय ते देऊ शकत नाहीत का? हे सरकारच बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
गृहराज्य मंत्र्यांची भाषाही संतपाजनक -आदित्य ठाकरे
महायुती सरकारच्या काळात राज्यातील माता – भगिणी सुरक्षित नाहीत. पुण्यात बसमध्ये महिलेवर बलात्कार होतो आणि यांचे गृहराज्य मंत्री म्हणता की त्या महिलेने प्रतिकार केला नाही, संघर्ष केला नाही. असे लोक यांच्या सरकारमध्ये आहेत. गृहराज्य मंत्र्यांची भाषा ही संतपाजनक आहे, त्यामुळे आता हे सरकारच बरखास्त झाले पाहिजे.
संतोष देशमुख यांच्यावर किती निर्घृणपणे अत्याचार करण्यात आले याची माहिती हिवाळी अधिवेशनातच जितेंद्र आव्हाड, भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली होती. तेव्हाच खरे तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे होता. आता जनतेचा रोष पाहून यांनी राजीनामा घेला आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंडेंच्या राजीनाम्याला इतका वेळ का लागला? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यासंबंधीचे ट्विट ही त्यांनी केले.
हा महाराष्ट्र थांबलाच पाहिजे!
संतोष देशमुख ह्यांच्या हत्येच्या वेळेसचे माध्यमांत फिरणारे फोटो पाहून साऱ्या महाराष्ट्रासारखंच प्रचंड दुःख झालंय, चीड आलीये…. मुख्यमंत्र्यांनी आता ह्या प्रकरणी ज्यांना ते आश्रय देत होते त्यांचा राजीनामा मागितल्याचंही समजतंय…
पण ह्या…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 4, 2025
हेही वाचा : Dhananjay Munde Resign : मोठी बातमी! धनंजय मुंडे कार्यमुक्त, राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला