Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईOshiwara Fire : ओशिवरातील फर्निचर मार्केटला आग, सिलिंडरच्या स्फोटाने परिसराला हादरे

Oshiwara Fire : ओशिवरातील फर्निचर मार्केटला आग, सिलिंडरच्या स्फोटाने परिसराला हादरे

Subscribe

गोरेगाव-जोगेश्वरी दरम्यान असलेल्या ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 11 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजताच्या सुमारास फर्निचर मार्केटमधील एका फर्निचरच्या दुकानाला ही आग लागली. परंतु, काही वेळातच सिलिंडरचे स्फोट झाल्याने या आगीने रौद्ररुप धारण केले.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील विविध भागांमध्ये आगी लागण्याच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी उपनगरातील गोरेगाव पूर्व येथे असलेल्या लाकडी गोदामाला आग लागली होती. या आगीच्या घटनेनंतर काही दिवसांमध्येच आता पुन्हा गोरेगाव-जोगेश्वरी दरम्यान असलेल्या ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 11 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजताच्या सुमारास फर्निचर मार्केटमधील एका फर्निचरच्या दुकानाला ही आग लागली. परंतु, काही वेळातच सिलिंडरचे स्फोट झाल्याने या आगीने रौद्ररुप धारण केले. तर सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Oshiwara Fire at furniture market explosion of cylinder shook the area)

ओशिवरा एस. व्ही. रोड या भागामध्ये फर्निचरचे मोठे मार्केट आहे. हे मार्केट फर्निचरच्या वस्तूंशिवाय इतर शोभेच्या वस्तूंसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी लाकडाची गोदामे सुद्धा आहेत. अशातच सकाळी 11 वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीने ओशिवरा फर्निचर मार्केटमधील अनेक दुकांनाना आपल्या भक्ष्यस्थानी घेतले. तासाभरातच वाढलेल्या आगीमुळे 25 पेक्षा अधिक दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. ही आग विझवण्यासाठी 10 ते 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग मोठी असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

हेही वाचा… Disaster Management Authority : शिंदेंचा समावेश मुद्दाम टाळला की…, रोहित पवारांना संशय

अग्निशमन दलासोबतच पोलिसांकडून सुद्धा परिसरातील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. एस. व्ही. रोड हा गोरेगाव-जोगेश्वरीमधील वाहतुकीचा महत्त्वाचा रस्ता असल्याने यामुळे या परिसरातील वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाला आहे. परंतु, आग लागल्यानंतर साधारणतः 10 ते 12 सिलिंडरचे स्फोट झाल्याने ही आग आणखी भडकत आहे. सध्या या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई अग्निशमन दलाने आगीला लेव्हल 2 ची आग (मोठी आग) म्हणून घोषित केले. पण शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत अद्याप कोणतीही जीविहतानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.