भाईंदर : काशीमिरा परिसरातील काशिगाव, माशाचा पाडा येथे राहणार्या एका २१ वर्षीय तरुणाने त्याच परिसरात असलेल्या ग्रीन व्हॅली स्टुडिओच्या जवळ बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काशिगाव परिसरात ४ मार्च रोजी सकाळी सहा वाजता पोलीस हवालदार सुशांत महाले व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान प्रविण परदेशी हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्याच दरम्यान डायल ११२ प्रणालीवरती कॉल आला होता की माशाचा पाडा, ग्रीन व्हॅली स्टुडीओ जवळ, एका मुलाने गळफास घेतला आहे. त्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळावर पोहोचले असता त्याठिकाणी बाभळीच्या झाडाला नायलॉन दोरीने साहाय्याने गळफास घेतलेला होता. सदरील मृत युवकाचे नाव विशाल सखाराम कलवले,( वय २१ वर्षे, रा. खरबवाडी, पोस्ट वायगाव, ता. अहमदपूर, जिल्हा लातूर) असे आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ रूग्णवाहिका बोलवून सदरील मृतदेह झाडावरुन खाली उतरवून भाईंदर पश्चिमेच्या पंडीत भिमसेन जोशी रुग्णालय येथे नेला. त्याठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले आहे.
गळफास घेऊन २१ वर्षीय युवकाची आत्महत्या
written By Roshan Chinchwalkar
Bhayandar
काशीमिरा परिसरातील काशिगाव, माशाचा पाडा येथे राहणार्या एका २१ वर्षीय तरुणाने त्याच परिसरात असलेल्या ग्रीन व्हॅली स्टुडिओच्या जवळ बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

संबंधित लेख