Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईपालघरलाचेची मागणी केल्या प्रकरणी सहायक पोलीस निरिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

लाचेची मागणी केल्या प्रकरणी सहायक पोलीस निरिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

काशीमिरा गुन्हे शाखेच्या युनिट एकमध्ये कार्यरत असलेला सहायक पोलीस निरिक्षक कैलास टोकले याने वाहनांच्या बनावट नोंदणीप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात डिसेंबर २०२३ साली गुन्हा दाखल केला होता.

भाईंदर :- पोलीस आयुक्तालयाच्या विरार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बनावट वाहन नोंदणी नंबर प्रकरणी अटक आरोपीला गुन्ह्यात जामीन होण्यास मदत करण्यासाठी व त्यांच्या सोयीनुसार कागदपत्रे बनवितो म्हणून लाचेची मागणी केल्या प्रकरणी लाच मागणीचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशीमिरा गुन्हे शाखेच्या युनिट एकमध्ये कार्यरत असलेला सहायक पोलीस निरिक्षक कैलास टोकले याने वाहनांच्या बनावट नोंदणीप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात डिसेंबर २०२३ साली गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा तपासासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने काशीमिरा गुन्हे शाखा युनिट एककडे होता. त्यात पोलिसांनी सदरील गुन्ह्यात ३४ बनावट बसेसची नोंदणी केली आणि त्यात वाहनांची चेसिस नंबरमध्ये छेडछाड करून अरुणाचल प्रदेशात नोंदणी करून त्यांची वसई प्रादेशिक परिवहन विभागात नोंदनी करून त्याचा वापर सुरू होता. त्या गुन्ह्यात फिर्यादीचा भाऊ व आरोपी राम कैलास लालबहादूर यादव याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर अटक केलेल्या आरोपींना जामीन होण्यास मदत तसेच सोईनुसार कागदपत्रे बनवतो असे सांगून टोपले याने १० लाख रुपयांची मागणी केली होती असे  लाचलुचपतच्या पडताळणीत निष्पन्न झाल्याने लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोपले हा फरार असून अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन थोरात हे करत आहेत.